जुन्नर / प्रा.सतिश शिंदे : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील बोतार्डे गावातील ( भिमनगर ) येथे आज शुक्रवार दिनांक ५ मे वैशाखी पौर्णिमा बुध्द पौर्णिमेनिमित्त महाकारूणिक तथागत भगवान गौतम बुध्द यांची २५८५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सकाळी ९ वाजता कार्यक्रम प्रसंगी दिपप्रज्वलन सामुदायिक बुध्दवंदना परित्राण पाठ घेण्यात आला. तसेच भगवान गौतम बुध्दांच्या मूर्तीस फुले वाहण्यात आली. तथागात गौतम बुध्द व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जुन्नर तालुक्याचे उपाध्यक्ष सुरेश खरात, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व ग्रामपंचायत सदस्य बोतार्डे जनार्दन मरभळ, बौध्द विकास मंडळाचे सेक्रेटरी बाळू खरात, सहसेक्रेटरी सतिश शिंदे, वैभव खरात, प्रतिक खरात, विजय पोटे हे कार्यक्रमाला उपस्थित होते.