Friday, May 3, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड : स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हिरामण बारणे यांचे कोरोनाने निधन

पिंपरी चिंचवड : स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हिरामण बारणे यांचे कोरोनाने निधन

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हिरामण बारणे यांचे कोरोनामुळे आज (शनिवारी) निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. नगरसेवक निलेश बारणे, उद्योजक महेश बारणे यांचे ते वडील होत. तर, मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचे मोठे बंधू होत.

हिरामण बारणे यांची थेरगावच्या उपसरपंचपदापासून जिवनकार्याला सुरुवात झाली. 1986 च्या महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत बारणे थेरगावमधून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. हिरामण बारणे यांनी 1988 ते 89 मध्ये स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे सदस्यम्हणून ही त्यांनी काम केले. त्याचबरोबर संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे सदस्य अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. 

अर्धांगवायूवरील उपचारासाठी 15 दिवसांपूर्वी ते निपाणीला गेले होते. त्यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. पुना हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय