Thursday, May 2, 2024
HomeNewsशाहूनगर येथील पाणीपुरवठा विस्कळीत,सेवा रस्त्यासहित विविध मागण्यांची पूर्तता करा.

शाहूनगर येथील पाणीपुरवठा विस्कळीत,सेवा रस्त्यासहित विविध मागण्यांची पूर्तता करा.

सुप्रिया चांदगुडे यांचे आयुक्तांना निवेदन

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:24 फेब्रुवारी-
शाहूनगर,चिंचवड येथील विविध नागरी समस्या प्रलंबित आहेत.याबाबत विविध मागण्यांचे निवेदन शाहूनगरवासीयांच्या वतीने येथील आधार महिला मंडळाच्या अध्यक्षा सुप्रिया चांदगुडे यांनी आयुक्त शेखर सिंह याना दिले आहे.परिसरातील कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा,बंद केलेला सेवा रस्ता,क्रीडांगणातील अस्वछता ई समस्यांचे आठ दिवसात निवारण करा,अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले.



1)राजश्री शाहू क्रीडांगण शाहूनगर येथील क्रीडांगणातील धुळीचा त्रास आसपासच्या सोसायटीमधील नागरिकांना होत असल्याने तिथे एक दिवस आड एक दिवस पाणी मारणे,क्रीडांगणावरती सेक्युरिटी गार्ड नेमणे, इलेक्ट्रिसिटी (DP) नवीन बसवणे.
2)एचडीएफसी कॉलनी येथील पत्रा शेड व सामान ठेवण्यात आले आहे त्याचा नागरिकांना येजा करण्यासाठी त्रास सहन करावा लागतोय त्यासाठी पत्रा शेड व सामान लवकरात लवकर या ठिकाणाहून हलवणे.
3) शाहूनगर येथे सध्या एक आड एक दिवस पाणी येत आहे यापुढे येणारे महिने हे उन्हाळ्याचे व तीव्र उष्णतेचे महिने असल्यामुळे शाहूनगर वासियांना दररोज पाणी मिळावे यासाठी व्यवस्था करण्यात यावी.
4)शाहूनगर येथे रस्ता क्रॉसिंग करण्यासाठी पूर्णपणे ओपन करावा अशी देखील मागणी केली, काही कारणास्तव गेले दोन ते तीन महिने शाहूनगर मध्ये प्रवेश करणारा समोरील सिग्नल रस्ता बंद करण्यात आला होता तो पुन्हा एकदा सुरू करावा असे सर्व नागरिकांचे मागणी होते, तरी तो रस्ता पुन्हा सुरू करावा यासाठी आठ दिवसांचे मुदत देण्यात आले आहे.

अशाप्रकारे नागरिकांना होणाऱ्या त्रासांवर योग्य ती सूचना देऊन या सर्व मागण्यांची पूर्तता करावी अशी विनंती आयुक्तांना केली आहे. यावेळी सुप्रिया चांदगुडे,दिपाली करंजकर,स्वाती शहाणे,संदीप चव्हाण,सोमनाथ शेळके,पांडुरंग पाटील,संजय पाटील,अनिल पाटील,महेश मेस्त्री,लक्ष्मण टकेकर,विशाल देसले उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय