Saturday, December 28, 2024
HomeNewsईपीएफ-95,निवृत्ती वेतनाचा पर्याय निवडण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी- भारतीय मजदूर संघ

ईपीएफ-95,निवृत्ती वेतनाचा पर्याय निवडण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी- भारतीय मजदूर संघ

पुणे:निवृत्ती वेतनाचा पर्याय निवडण्यासाठी आणि आवश्यक ती कागदपत्रे जमा करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी भारतीय मजदूर संघाच्या पुणे जिल्ह्यातर्फे भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 4 नोव्हेंबर 2022 च्या आदेशानुसार निवृत्ती वेतनाचा पर्याय स्वीकारण्याबाब येत्या 3 मार्च 2023 पर्यंत मुदत दिली आहे.
न्यायालयाचेआदेश सर्वसामान्य कामगारांपर्यंत अद्यापही पूर्णपणे पोहोचलेले नाहीत.भविष्य निर्वाह निधी संकेतस्थळाच्या काही वेळा समस्या निर्माण होतात.भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून सविस्तर माहिती मिळत नाही. या कार्यालयाकडे आणि संकेतस्थळावही विहीत नमुन्यातील अर्ज ऊपलब्ध नाहीत, त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात यावी, असे भारतीय मजदूर संघाचे म्हणणे आहे.‌

भविष्य निर्वाह निधीचे विभागीय आयुक्त अमित वशिष्ठ यांना हे निवेदन देण्यात आले आहे. भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण, विडी कामगार संघांचे कार्याध्यक्ष उमेश विस्वाद आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन सादर केले. दरमहा किमान पाच हजार रुपये निवृत्तीवेतन आणि बदलता महागाई भत्ता असावा, अशी मागणी यापूर्वीच भारतीय मजदूर संघाने केंद्र शासनाकडे केली आहे

संबंधित लेख

लोकप्रिय