Sunday, May 5, 2024
HomeNewsIBM-कंपनी 3900 कामगारांना घरी बसवणार ;आयटी-टेक कंपन्यांना मंदीची मोठी झळ सुरू

IBM-कंपनी 3900 कामगारांना घरी बसवणार ;आयटी-टेक कंपन्यांना मंदीची मोठी झळ सुरू

Lay off-आयटी क्षेत्रातील IBM कार्पोरेशन कंपनीने बुधवारीअमेरिका,युरोपमधील 3,900 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कंपनीला त्याचे वार्षिक उत्पन्नाचे लक्ष्य गाठण्यात अपयश आल्याने कर्मचारी कपात करण्यात येत आहे.आयबीएमचे मुख्य वित्तीय अधिकारी जेम्स कॅव्हनॉफ म्हणाले की कंपनी अजूनही “क्लायंट-फेसिंग रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी कामावर घेण्यास वचनबद्ध आहे.
कंपनीला मागील दोन वर्षांच्या तुलनेत या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत 2 टक्के उत्पन्न घटले आहे.

चौथ्या तिमाहीत महसुलाचे लक्ष्य गाठण्याच्या वाढत्या अपेक्षांनंतर ले-ऑफ आले आहेत. ले-ऑफच्या घोषणेमूळे शेअर बाजार अस्थिर झाला आहे.
अमेरिकेत मोठया प्रमाणात मंदीला सुरवात झाल्यापासून गुगल,अमेझॉन,ट्विटर,मायक्रोसॉफ्ट,मेटा मधील हजारो कामगारांना लेऑफ देण्यात आले.कोरोना काळात टेक,आयटी कंपन्यांना मोठा व्यवसाय मिळाला होता.रशिया युक्रेन युद्धामुळे युरोप,अमेरिका,इंग्लड मध्ये महागाई वाढली आहे.टेक-आयटी कंपन्यांचा व्यवसाय घसरणीला लागला आहे.

जगातील नामवंत आयटी कंपन्या कामगारांना कामावरून काढून टाकत आहेत. गुगल 12 हजार कामगारांना कामावरून काढून टाकत आहे. मायक्रोसॉफ्ट 10 हजार नोकऱ्या कमी करणार आहे अँमेझाॅन सारख्या कंपन्यांनीही काम बंद केले आहे. आता त्या यादीत आयबीएम सामील झाली आहे. अनेक अहवालांनुसार, नोव्हेंबर 2022 पासून जवळपास 2 लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय