Sunday, May 5, 2024
Homeजिल्हासलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेल महागले; जाणून घ्या नवे इंधन दर

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेल महागले; जाणून घ्या नवे इंधन दर

नवी दिल्ली : गेल्या सलग तीन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असून, मागील आठ दिवसात डिझेल १.५५ रुपयांनी तर पेट्रोल ७० पैशांनी महागले आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी गेले सलग तीन दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. गुरुवारी कंपन्यांनी पेट्रोलमध्ये २५ पैसे आणि डिझेलमध्ये ३० पैशांची वाढ केली होती. या दरवाढीनंतर भोपाळमध्ये पेट्रोलचा भाव ११० रुपयावर गेला होता. शुक्रवारी पेट्रोल दरात २५ पैसे आणि डिझेलमध्ये ३० पैसे वाढ करण्यात आली. तर आता आज शनिवारी पेट्रोल दर २० पैसे आणि डिझेल दर २५ पैशांनी वाढवण्यात आला आहे.

मुंबईत पेट्रोलचा दर किती?

आजच्या दरवाढीनंतर मुंबईत एक लीटर पेट्रोलचा दर १०८.१५ रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोल १०२.१४ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९९.७६ रुपये इतका वाढला आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०२.७४ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११०.५९ रुपयांपर्यंत वाढला आहे. बंगळुरात पेट्रोल १०५.६५ रुपये झाले आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय