Thursday, April 25, 2024
Homeग्रामीणसांगोला : कार्यकर्ता मेळाव्यास महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे :...

सांगोला : कार्यकर्ता मेळाव्यास महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे : दिपक साळुंखे पाटील

राष्ट्रवादी भवन येथे नगरपालिका नियोजन बैठक संपन्न

 

सांगोला : २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सांगोला शहर असो किंवा संपूर्ण तालुक्याच्या विकासाची गाडी सुसाट सुटली आहे. आमदार शहाजीबापू पाटील आणि मी सांगोला शहर आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध आहोत. सांगोला शहराचा रखडलेला विकास पूर्वपदावर आणण्यासाठी आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, शिवसेना, आणि काँग्रेस पार्टीने आघाडी केली आहे. हि आघाडी शहराच्या विकासासाठी बांधील असेल आगामी निवडणुकीची चर्चा व विचार विनिमय करण्यासाठी महाविकास आघाडीने शनिवार दि २ ऑक्टोंबर रोजी शहरातील हर्षदा लॉन्स येथे दु. 2.00 वा. कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्याचे उपाध्यक्ष माजी आमदार दिपक साळुंखे पाटील यांनी केले.

नगरपालिका निवडणूक 2021 22 च्या अनुषंगाने राष्ट्रवादी भवन येथे सांगोला शहरातील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांची दि. 1 ऑक्टो. रोजी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीस संबोधित करताना दिपकआबा बोलत होते. 

हेही पहा ! गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज महाराष्ट्र पुरस्कार’ प्रदान !

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिंदे शहराध्यक्ष तानाजी पाटील, सुभाष लऊळकर,  पियुष साळुंखे पाटील, माजी उपनगराध्यक्ष शिवाजी बनकर, नगरसेवक सोमनाथ लोखंडे, जुबेर मुजावर, सतीश सावंत, अनिल खडतरे, राजेंद्र पाटील, दिलीप मस्के, विजय राऊत, प्रताप मस्के, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सखुबाई वाघमारे, शहराध्यक्ष शुभांगीताई पाटील, पूजा पाटील, जया पाटील, सुनिता खडतरे, भामाताई जाधव, शंकुतला खडतरे, सुचिता मस्के, शशिकला खाडे, संगीता पाखरे, प्राजक्ता पाटील, चैत्रजा बनकर, मंगल खाडे आदींसह प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजी बनकर पियुष साळुंखे पाटील यांनीही आपले विचार व्यक्त करताना आगामी नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सर्व कार्यकर्त्यांनी ताकतीनिशी मैदानात उतरण्याचे आवाहन केले.

या नियोजन बैठकीस प्रवीण इंगोले, तानाजी भोकरे, सुभाष देशमुख, सुखदेव जांगळे, सिद्धेश्वर इंगोले, वैभव जांगळे, सुधीर देशमुख, बाळू पवार, सुनिल पवार, आदींसह शहरातील प्रमुख कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी सदरच्या नियोजन बैठकीस उपस्थित होते.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय