Saturday, May 4, 2024
Homeआंतरराष्ट्रीयअमेरिकेत अभूतपूर्व 'बॉम्ब' हिमवादळ, 48 मृत्युमुखी; 7 हजार विमान उड्डाणे रद्द, वादळ...

अमेरिकेत अभूतपूर्व ‘बॉम्ब’ हिमवादळ, 48 मृत्युमुखी; 7 हजार विमान उड्डाणे रद्द, वादळ जपानच्या दिशेने

न्यूयॉर्क : चीनमध्ये कोरोना विषाणूचा बॉम्ब फुटला असून जनजीवन व्यस्त झाले आहे, तर अमेरिका आणखी एका संकटाचा सामना करत आहे.येथे बॉम्ब चक्रीवादळ म्हणजेच ‘हिवाळी वादळ’ मुळे 14 लाख लोकांचे जीवन ठप्प झाले आहे. बर्फाच्या वादळाने ख्रिसमस सेलिब्रेशनचे सर्व नियोजन धुऊन काढले आहे.सरकारने लोकांना  घराबाहेर न पडण्याचे सक्त आदेश दिले आहेत.

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, बॉम्ब चक्रीवादळामुळे 14 लाखांहून अधिक घरांची वीज खंडित झाली आहे. तापमान -45 अंशांवर घसरले आहे. अंधार पडल्याने आणि तापमानात घट झाल्याने जनजीवन ठप्प झाले आहे. उत्तर अमेरिकेतील सात राज्यात प्रचंड बर्फ पडत आहे. समुद्र किनारपट्टी आणि महत्वाचे रस्ते बर्फाने खचाखच भरल्यामुळे आरोग्य आणि तातडीची सेवा ठप्प झाली आहे.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय