Friday, December 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडभिडे वाडा या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक होणार ! 

भिडे वाडा या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक होणार ! 

सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकासंदर्भात तात्काळ बैठक घेऊ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर : स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक पुणे येथील भिडे वाडा याठिकाणी करण्यासंदर्भात तात्काळ बैठक घेण्यात येईल आणि या राष्ट्रीय स्मारकासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य छगन भुजबळ यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक भिडे वाडा येथे करण्याबाबत राज्य शासन गंभीर आहे. लवकरच त्यासंदर्भात बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

• भिडे वाड्याचे महत्व : 

१ जानेवारी १८४८ रोजी सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे पती आणि थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मदतीने बुधवार पेठेतील तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.

• राज्यभरातून राष्ट्रीय स्मारकाची मागणी

मुलींना शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या आणि ज्या ठिकाणी यांची मुहूर्तमेढ रोवली त्या भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी सातत्याने विविध संस्था, संघटना मागणी करत होत्या. 

नुकतेच स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे राज्य अधिवेशन जुन्नर येथे १८ ते २० नोव्हेंबर रोजी किल्ले शिवनेरी च्या पायथ्याशी पार पडले. यावेळी कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नये व भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी मागणी घेऊन भिडेवाडा ते किल्ले शिवनेरी अशी १०० किलोमीटर ची शिक्षण ज्योत काढत सरकारचे लक्ष वेधले होते. कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेत या मागण्या आणि शिक्षण ज्योत ची चर्चा होती. 

Lic

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय