Friday, December 27, 2024
HomeNewsपुण्यातील अभ्यासिकेत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने या विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू ; गावावर शोककळा...

पुण्यातील अभ्यासिकेत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने या विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू ; गावावर शोककळा !

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी देशभरातील तरुण पुण्याची वाट धरतात. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं हे मोठं कठीण काम असतं.सलग 15 ते 18 तास बसून मुलं अभ्यास करतात, रात्रीचा दिवस करून मन लावून मुलं अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करीत असतात. मात्र सर्वांनाच यात यश मिळतं असं नाही. यामुळे मुला-मुलींमध्ये खूप तणाव असतो. नुकतच पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.

पुण्यातील वडगाव शेरी येथील श्री. स्टडी सेंटर या अभ्यासिकेत अभ्यास करताना एका तरुणीचा हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पूजा वसंत राठोड (वय २५) असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. मूळची सोलापूरची असलेल्या पुजाने संगमेश्वर येथे बीएससीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुजा पुण्यातील टाटा कन्सल्टिंग सर्विसेसमध्ये काम करीत होती. नोकरी करता करता ती स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही करीत होती. पुजाची लहान बहीणदेखील स्पर्धा परीक्षेची तयारी करते.

मंगळवारी पुजा स्टडी सेंटरच्या अभ्यासिकेत अभ्यास करीत बसली होती. अचानक तिला हृदयविकाराचा झटका आला आणि ती जागेवरच कोसळली. यानंतर काही विद्यार्थ्यांनी तिला रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पुजाने हृदयविकाराचा झटका आल्याची घटना अभ्यासिकेतील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. काल पुजा राठोड हिच्यावर तिचं मूळ गाव कोंडी तांडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

संबंधित लेख

लोकप्रिय