Tuesday, April 23, 2024
HomeNewsप्रस्थापितांना धक्का देत डॉ कविता वरे ठरल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किसळ गावच्या...

प्रस्थापितांना धक्का देत डॉ कविता वरे ठरल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किसळ गावच्या नव्या सरपंच !

मुरबाड तालुक्यात आगामी 35 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच, किसळ ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वांना धक्का देणारा प्रकार घडला .ग्रामपंचायत निवडणुकीत प्रथमच कम्युनिस्ट पक्षाने खाते उघडले असून किसळ ग्रामपंचायतच्या सरपंच पदी कॉम्रेड डॉक्टर कविता वरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे प्रस्थापितांना धक्का बसलेला आहे.

मुरबाड तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून 28 सप्टेंबर रोजी तहसीलदार कार्यालयात अर्जाची छाननी सुरू असताना किसल ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदाचे शिवसेना उमेदवार व भाजप उमेदवार यांचे अर्ज छाननीत बाद झाल्याने डॉक्टर कविता वरे यांचा एकमेव अर्ज राहिला. त्या बिनविरोध निवडून आल्या असून तालुक्यात प्रथमच कॉम्रेड डॉक्टर कविता वरे यांच्या रूपाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सरपंच झालेला आहे.

त्या डहाणूचे आमदार कॉम्रेड विनोद भिवा निकोले यांच्या विश्वासू सहकारी असून गावच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून काम करणार असल्याचे डॉक्टर वरे यांनी यावेळी सांगितले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय