कणकवली : भाजप आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज मंगळवारी सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर बुधवारी नितेश राणे कणकवली न्यायालया समोर शरण आले.
नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली होती. त्यावेळी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर नितेश राणे हे कणकवली न्यायालया समोर शरण आले आहे. या प्रकरणाच्या सुनावणी वेळी सरकारी वकिलांकडून नितेश राणे यांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात येत होती. तर राणे यांच्या वकीलांकडून न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात येत होती. मात्र, नितेश राणे यांना कणकवली कोर्टाकडून २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
नितेश राणे न्यायालया समोर शरण येण्या अगोदर त्यांनी “समय बडा बलवान है. इन्सान खामो खा गुरुर करता है!!” अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले होते.
— nitesh rane (@NiteshNRane) February 2, 2022
सुनावणी दरम्यान कणकवली न्यायालया बाहेर मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता. तसेच, माध्यमांना देखील कोर्टात जाण्यास मज्जाव करण्यात आला होता.
दरम्यान, नितेश राणे यांच्या वकिलांनी हायकोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता, मात्र तो अर्ज पुन्हा मागे घेण्यात आला.
हेही वाचा
आता माजी खासदार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल