Thursday, September 19, 2024
Homeराज्यआजपासून राज्यात पेट्रोल – डिझेलचे नवे दर जाहीर, एका क्लिकवर पहा तुमच्या...

आजपासून राज्यात पेट्रोल – डिझेलचे नवे दर जाहीर, एका क्लिकवर पहा तुमच्या शहरातील दर !

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी संयुक्त पत्रकार परिषद घेत पेट्रोल, डिझेलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी करत असल्याची घोषणा केली. त्यामध्ये पेट्रोलच्या दरात ५ रुपयांनी तर डिझेलच्या दरात ३ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या घोषणेनंतर आज मध्यरात्रीपासून पेट्रोल, डिझेलचे नवीन दर राज्यात लागू करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे आज मुंबईत पेट्रोल १०६.२५ रुपये, तर डिझेल ९४.२२ रुपये प्रती लिटरवर आले. गुरुवारी मुंबईत पेट्रोलची किंमत १११.३० रुपये तर डिझेलची किंमत ९७.२२ रुपये प्रति लिटर होती.

जिल्ह्यातील पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर
अहमदनगर – पेट्रोल 106.14 (-5.33), डिझेल 92.65 (-3.3)
अकोला – 106.06 (-5.04), डिझेल 92.61 (-3.01)
अमरावती – 107.06 (-5.4), डिझेल 93.57 (-3.35)
औरंगाबाद – 107.93 (-4.89), डिझेल 95.88 (-1.36)
भंडारा – 107.01 (-4.62) , डिझेल 93.57 (-3.35)
बीड – 107.77 (-4.91), डिझेल 94.25 (-2.86)
बुलढाणा – 106.74 (-5.09), डिझेल 93.26 (-3.05)
चंद्रपूर – 106.17 (-4.99) , डिझेल 92.73 (-2.96)
धुळे – 106.05 (-5.43), डिझेल 92.58 (-3.38)
गडचिरोली – 106.92 (-5.04), डिझेल 93.45 (-3.01)
गोंडिया – 107.52 (-5.16), डिझेल 94.01 (-3.12)
ग्रेटर मुंबई – 106.42 (-5.11), डिझेल 94.38 (-3.07)
हिंगोली – 106.99 (-5.64), डिझेल 93.50 (-3.58)
जळगाव – 107.57 (-5.18), डिझेल 94.03 (-3.14)
जालना – 107.63 (-5.66), डिझेल 94.09 (-3.6)
कोल्हापूर – 106.37 (-5.5), डिझेल 92.90 (-3.45)
लातूर – 107.25 (-5.04), डिझेल 93.74 (-3.01)
मुंबई – 106.31 (-5.04), डिझेल 94.27 (-3.01)
नागपूर – 106.03 (-5.15), डिझेल 92.58 (-3.11)
नांदेड – 108.19 (-5.69), डिझेल 94.65 (-3.63)
नंदुरबार – 107.05 (-4.75), डिझेल 93.55 (-2.72)
नाशिक – 106.69 (-4.76), डिझेल 93.18 (-2.74)
उस्मानाबाद – 107.22 (-4.12), डिझेल 93.71 (-2.12)
पालघर – 106.62 (-5.07), डिझेल 93.09 (-3.03)
परभणी – 109.40 (-4.98), डिझेल 95.79 (-2.95)
पुणे – 106.17 (-5.58), डिझेल 92.68 (-3.52)
रायगड – 105.89 (-5.27), डिझेल 92.39 (-3.23)
रत्नागिरी – 107.24 (-5.34), डिझेल 93.68 (-3.32)
सांगली – 105.97 (-5.4), डिझेल 92.52 (-3.35)
सातारा – 106.99 (-4.68), डिझेल 93.48 (-2.65)
सिंधुदुर्ग – 107.93 (-5.02), डिझेल 94.41 (-2.98)
सोलापूर – 106.07 (-5.76), डिझेल 92.61 (-3.7)
ठाणे – 106.01 (-4.8), डिझेल 92.50 (-2.78)
वर्धा – 106.57 (-4.98), डिझेल 93.10 (-2.94)
वाशिम – 106.57 (-5.18), डिझेल93.10 (-3.14)
यवतमाळ – 107.72 (-4.5), डिझेल 94.21 (-2.48)

पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी केल्यामुळे सरकारवर ६ हजार कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. मात्र, हा महसूल गेला तरी विकासकामांवर कोणताही परिणाम होणार नाही, याची सरकार काळजी घेईल, असे प्रतिपादन गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

दरम्यान, केंद्राने दीड महिन्यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या होत्या. यानंतर महाराष्ट्र सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा :

बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार

सरपंच आणि नगराध्यक्ष आता थेट जनतेमधून निवडून देता येणार

राज्यात अमृत २.० अभियान राबविणार, काय आहे ‘अमृत २.० अभियान’

‘त्या’ व्यक्तींना आता पुन्हा मिळणार दरमहा १० हजार मानधन, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख

लोकप्रिय