Friday, September 20, 2024
Homeराजकारणब्रेकिंग : मुख्यमंत्री शिंदे यांनी केली पेट्रोल डिझेलच्या दरात ‘इतकी’ कपात

ब्रेकिंग : मुख्यमंत्री शिंदे यांनी केली पेट्रोल डिझेलच्या दरात ‘इतकी’ कपात

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत चाचणीच्या दिवशीच इंधनदर कपात करणार असल्याची घोषणा केली होती. आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंधन दर कपातीची घोषणा केली आहे.

देशात मागील काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यानंतर केंद्र सरकारने इंधनाच्या दरात कपात करत सामान्यांना दिलासा दिला होता. त्यावेळी ठाकरे सरकारने देखील काहीशी कपात केली होती. आता एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत सरकार स्थापनेनंतर पेट्रोल पाच आणि डिझेल तीन रुपयांची दर कपात केल्याची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. आज मध्यरात्रीपासून पेट्रोल, डिझेलचे नवीन दर लागू होतील.

शिंदे म्हणाले की, राज्य सरकारने पेट्रोल डिझेल VAT कमी केला आहे. त्यामुळे आता पेट्रोल प्रती लिटर पाच रुपये डिझेल प्रतीलिटर तीन रुपयांनी स्वस्त होणार आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर सहा हजार कोटींचा अतिरिक्त भार पडणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.

संबंधित लेख

लोकप्रिय