Friday, December 27, 2024
Homeआंतरराष्ट्रीयस्वातंत्र्य दिनाच्या परेडवर अंदाधुंद गोळीबार, ५ जणांचा मृत्यू, ५७ जखमी

स्वातंत्र्य दिनाच्या परेडवर अंदाधुंद गोळीबार, ५ जणांचा मृत्यू, ५७ जखमी

शिकागो : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अमेरिकेत गोळीबाराच्या घटना समोर येत आहे. या गोळीबाराच्या थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. (Chicago Shooting) शिकागोमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या परेडमध्ये 22 वर्षीय मुलाने अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला असून ५९ जण जखमी झाले आहेत.

शिकागो सन-टाइम्सच्या वृत्तानुसार, शिकागोमधील इलिनॉयच्या हायलँड पार्कमध्ये सोमवारी, ४ जुलै रोजी स्वातंत्र्य दिनाच्या परेड दरम्यान एका तरुणाने अचानक अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबाराचा आवाज ऐकून एकच गोंधळ उडाला. लोक सैरभैर पळू लागले. या गोळीबारात ६ जणांचा मृत्यू झाला, तर ५९ हून अधिक जण जखमी झाले. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचेही पोलिसांनी सांगितले. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या हल्ल्याच्या काही तासांनंतर पोलिसांनी या गोळीबारातील एका संशयिताला अटक केली. रॉबर्ट क्रेमो असे या आरोपीचे नाव असून तो २२ वर्षांचा आहे. त्याने किरकोळ दुकानाच्या छतावरून परेडवर गोळीबार केला. तपासादरम्यान घटनास्थळावरून पोलिसांनी एक रायफल जप्त केली आहे.

या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी शोक व्यक्त केला आहे. ‘बंदूक हिंसेविरोधातील आमची लढाई सुरुच राहणार आहे. हिंसा संपवण्यासाठी आमचा संघर्ष सुरुच राहील,’ असे त्यांनी म्हटलं. तसेच अमेरिकेतील इतर नेत्यांनीही शोक व्यक्त केला आहे. हल्ल्यातील सर्व बळी आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती दु:ख व्यक्त करण्यात आले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय