Friday, December 27, 2024
Homeजिल्हामार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून उदयपूरमधील कन्हैयालाल यांच्या क्रूर हत्येचा तीव्र निषेध 

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून उदयपूरमधील कन्हैयालाल यांच्या क्रूर हत्येचा तीव्र निषेध 

मुंबई : राजस्थानमधील उदयपूर येथील एक शिंपी कन्हैयालाल यांची दोन मुस्लिमांनी क्रूर हत्या केली. या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या कृत्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची महाराष्ट्र राज्य कमिटीने तीव्र निषेध केला आहे.

पोलिसांनी दोन्ही गुन्हेगारांना तातडीने अटक केली, हे योग्यच आहे. आता त्यांना कायद्याची प्रक्रिया पार पाडत कडक शासन करा, अशी मागणी माकपने केली आहे.

अशा घटना घडू नयेत यासाठी धर्माधर्मात द्वेषपूर्ण वातावरण निर्माण करणाऱ्या प्रत्येक कृतीला पायबंद घातलाच पाहिजे, मग ती कृती करणारे कोणत्याही धर्माचे असोत, असे डॉ. उदय नारकर राज्य सचिव यांनी सांगितले.

संबंधित लेख

लोकप्रिय