जुन्नर : आपल्या जावयानेच बलात्कार केल्याची तक्रार सासूने जुन्नर पोलीसांकडे दिली आहे. सासू व जावयाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत ४६ वर्षाच्या पीडीत महिलेने २२ जून रोजी दिलेल्या तक्रारी नंतर पोलिसांनी ३८ वर्ष वयाच्या जावया विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली.
पीडित महिलेच्या तक्रारी नुसार जावयाने तिच्या राहत्या घरी तसेच एका डोंगराच्या पायथ्याशी मे २०२१ व फेब्रुवारी २०२२ मध्ये वेळोवेळी बलात्कार केला व नकळत त्याचा व्हिडिओ काढला. याबाबत कोणास काही सांगितल्यास तुमच्या मुलीला सोडून देईल. तुमच्या मुलाला जीवे मारून टाकीन. तुमच्या प्रॉपर्टी मध्ये मला हिसा द्या असे म्हणून व्हिडीओ क्लिप, मोबाईल मधील रेकॉर्डिंग व्हायरल करील अशी धमकी दिली असल्याचे नमूद केले आहे.
हेही वाचा :
- LPG Cylinder : निवडणुकीच्या रणधुमाळीत गॅस सिलिंडरच्या दरात बदल
- DMRL : संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा अंतर्गत 127 जागांसाठी भरती
- Salman Khan: अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या
- Nanded : महाराष्ट्र दिन, कामगार दिनानिमित्ताने सीटू कार्यालयात ध्वजारोहन व शहिदांना अभिवादन!
- NBCC : नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती