कीव : रशिया युक्रेन युद्धाला तेरा दिवस पूर्ण झाले तरीही युद्ध संपण्याची लक्षणे दिसत नाहीत. सुरुवातीला रशिया जिंकेल असं वाटत असताना युक्रेनच्या सैन्याने त्यांना कडवा प्रतिकार केला. त्यामुळे लढाई अधिक गुंतागुंतीची आणि अटीतटीची झाली आहे. एवढ्याशा वाटणाऱ्या युक्रेन ने प्रतिहल्ला करत रशियाच्या नाकीनऊ आणले आहेत.
वास्तविक पाहता यूक्रेन कडे बलाढ्य शस्त्रसाठा लष्करी सुविधा नाहीत म्हणून युक्रेनमधील नागरिक आता सैन्यात भरती होत आहेत .असच एक भारतीय विद्यार्थी सुद्धा युक्रेनच्या सैन्यात भरती झाला आहे
एकीकडे भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेन मधून बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगा सरकार राबवत असताना. दुसरीकडे मात्र या विद्यार्थ्यांनी स्वखुशीने युक्रेनच्या सैन्यदलात भरती होन्याचा अजब निर्णय घेतला. या विद्यार्थ्याचे नाव सैनिकेश रविचंद्रण आहे. तो एकवीस वर्षाचा आहे. रविचंद्रन तमिळनाडूच्या कोईम्बतूर येथे राहणारा आहे .शिक्षणानिमित्त तो येथे आला होता .मात्र युद्धजन्य परिस्थितीत त्याने स्वतःला सैन्यात भरती करून घेतला आहे. त्याच्यामते आर्मी मध्ये भरती होण्याचे त्याचे स्वप्न होते. ते या निमित्ताने पूर्ण झाले आहे.