Thursday, July 18, 2024
Homeजिल्हाDYFI पुणे जिल्हाध्यक्ष पदी डॉ. आशिष मेरूकर तर जिल्हा सचिवपदी सचिन देसाई...

DYFI पुणे जिल्हाध्यक्ष पदी डॉ. आशिष मेरूकर तर जिल्हा सचिवपदी सचिन देसाई यांची निवड !


पुणे : डेमोक्राटिक युथ फेडरेशन आॅफ इंडिया (DYFI) चे 5 वे पुणे जिल्हा अधिवेशन सोमवारी शहीद भगतसिंग सभागृह, समाज विज्ञान अकादमी येथे पार पडले. जिल्हा अध्यक्ष गणेश दराडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व DYFI चे उपाध्यक्ष इंद्रजित गावित यांनी उदघाटन केले. तसेच, उद्घाटनपर भाषणात संघटनेची ताकद वाढविण्यासाठी आवाहन केले व नाशिक जिल्ह्यात यावर्षी कशा प्रकारे विक्रमी 70 हजार सभासद नोंदणी पूर्ण केली याविषयीचा अनुभव सांगितला. 

मागील 4 वर्षाचा कार्यात्मक व संघटनात्मक अहवाल जिल्हा सचिव डॉ. ज्ञानेश्वर मोटे यांनी मांडला. या अधिवेशनाने बेरोजगारी विरोधात, धर्मांधता विरोधात तसेच व्यक्ती स्वातंत्र्या वरील हल्ल्याचा निषेध करणारा ठराव एकमताने पारित केले. डॉ.आशिष मेरूकर व सचिन देसाई यांनी अधिवेशनाचे अध्यक्षीय मंडळाचे कामकाज पाहिले तसेच अमीन शेख यांनी मिनिट्स कमिटीचे कामकाज पाहिले.

भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या एकूण ३५४ जागा, आजच अर्ज करा!

कॉ. देवयानी सत्येंद्र मोरे यांचे निधन !

अधिवेशनाने एकमताने 13 जनांची पुणे जिल्हा कमिटी निवडण्यात आली. डॉ. आशिष मेरूकर यांची जिल्हा अध्यक्ष तर सचिन देसाई यांची जिल्हासचिव म्हणून एकमताने निवड केली. तसेच, आमिन शेख (उपाध्यक्ष), संजय साबळे (सहसचिव), गणपत घोडे (कोषाध्यक्ष) तर डॉ. ज्ञानेश्वर मोटे, संतोष गायकवाड, डॉ. जितेंद्र शिंदे, चिंतामण ढेंगळे, तुकाराम पारधी, स्वप्निल जेवळे, भार्गवी लाटकर यांची सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.

राज्य सचिव साथी प्रीती शेखर यांनी त्यांच्या भाषणात पुणे जिल्ह्यात DYFI च्या वाढीसाठी व बेरोजगारीच्या प्रश्नावर कसे काम करता येईल यासंबधी मार्गदर्शन केले. अधिवेशनाच्या समारोपीय भाषणात कामगार नेते अजित अभ्यंकर यांनी बेरोजगारीच्या प्रश्नाकडे कसे पाहावे, ठोस मागण्या काय असाव्यात तसेच अबकी बार सिर्फ रोजगार ही घोषणा घेऊन काम करण्याचे महत्व पटवून सांगितले. सचिन देसाई यांनी आभार प्रदर्शन केले.

भारतीय नौदल नेव्ही मध्ये भरती!

राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये विविध पदांच्या २०६ जागा !


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय