वडूज : खटाव येथील चैतन्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या 27 कोटी गैरव्यवहार प्रकरणी मुख्य संशयित आरोपी संचालक संजय दिगंबर इनामदार (वय 61) याला अटक करून न्यायालयात हजर केले असता दहा दिवसांची पोलीस कोठडी त्यांना मिळाली आहे. दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयिताला पनवेल येथून ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, 2019 मध्ये पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारीनुसार आर्थिक गैरव्यवहार करून संशयित फरारी झाला . त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत होती. पोलीस संशयिताचा शोध घेत असताना तो सापडला आणि शिताफीने त्याला ताब्यात घेण्यात आले. या घोटाळ्याप्रकरणी महत्त्वाचा संशयित पोलिसांच्या ताब्यात आल्याने तपासाला आणखीनच गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी त्याला मिळाली. या गुन्ह्यांमध्ये अनेक लोक पसार आहेत .
ब्रेकिंग : भरतीसाठी १५ हजार ३९० पदांचे मागणीपत्र प्राप्त; तर १ हजार ७०० पदांसाठी लवकरच होणार भरती !
या बँकेमधील गैरव्यवहारामुळे ठेवीदारांच्या पैशाचे पुढे काय होणार आहे ?शिवाय आणखीन किती आरोपी ताब्यात येणार आहेत? मुख्य आरोपी केव्हा गजाआड होईल ?आणि खातेदारांना कधी न्याय मिळेल ?या असंख्य प्रश्नांची उत्तरे येत्या काळात मिळतील असे अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे, डीवायएसपी मोहन शिंदे यांनी सांगितले.
देशातील पहिलेच सावित्री पथक महाराष्ट्रातून सुरू !
आर्थिक गुन्हे तपास शाखेमधील पोलीस अधिकारी अभिजीत भोसले, पोलीस हवालदार प्रमोद नलावडे, राजेंद्र वायदंडे, संकेत माने, शशिकांत घाडगे यांच्या परिश्रमातून हा संशयित गळाला लागला आहे.
भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या एकूण ३५४ जागा, आजच अर्ज करा!