Monday, February 17, 2025

भारतीय विमानाचे अपहरण करणारा पाकिस्तानी दहशतवादी ठार

24 डिसेंबर 1999 रोजी एअर इंडियाच्या आयसी 814 विमानाचे अपहरण करणाऱ्या दहशतवाद्यांनी पैकी एक दहशतवादी जहूर मिस्त्री यांची हत्या झाल्याची बातमी समोर आली आहे .पाकिस्तान मधील कराची येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक मार्च रोजी दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी टारगेट किलिंग अंतर्गत घरात घुसून जहूर मिस्त्री वर गोळ्या घातल्या. मिस्त्री हा जैश ए मोहम्मद या संघटनेचा दहशतवादी होता. आणि कराचीमध्ये व्यापाऱ्याची ओळख घेऊन तो राहत होता.

वाकड : अभिसार फाउंडेशन च्या वतीने जागतिक महिला दिन साजरा !

या दहशतवाद्याने एअर इंडियाचे विमान नेपाळमधील काठमांडू येथून अपहरण करून अफगाणिस्तानातील कंदहार येथे नेले होते. त्याबदल्यात मसूर अजहर ,मुस्ताक अहमद, आणि अहमद उमर सईद शेख या तीन दहशतवाद्यांच्या सुटकेची मागणी केली होती.जहुर मिस्त्री याच्या अंत्यविधी मध्ये जैश चे अनेक मोठे दहशतवादी सामील झाले होते. त्याच्या हत्येनंतर परिसरामध्ये मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles