Sunday, December 22, 2024
Homeग्रामीणडॉ. प्रणोती जगताप यांच्या हस्ते भोसले यांच्या सी. एस.सी. सेंटरचे उद्घाटन

डॉ. प्रणोती जगताप यांच्या हस्ते भोसले यांच्या सी. एस.सी. सेंटरचे उद्घाटन

अनाथ निराधार मुलांसाठी मोफत ऑनलाईन सेवा तर गरजू शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत झेरॉक्स आदिवासी दांपत्याने देणे हे कौतुकास्पद – बापू ओहोळ

श्रीगोंदा : लोणी व्यंकनाथ या गावातील आदिवासी समाजातील छाया भोसले व संतोष भोसले या उच्चशिक्षित पती-पत्नीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सीएससी सेंटर चालू केले आहे, या सेंटरमध्ये अनाथ, निराधार मुलांना मोफत ऑनलाईन सेवा तर गरजू शालेय विद्यार्थ्यांना मोफत झेरॉक्स देणार असल्याची माहिती छाया भोसले यांनी दिली

डॉ. प्रणोती जगताप बोलताना म्हणाल्या की आदिवासी समाजातील दाम्पत्याने सर्व समाजातील अनाथ निराधार मुलांना मोफत ऑनलाईन सेवा देणे ही कौतुकास्पद गोष्ट आहे . समाजातील अनाथ, निराधार आणि गरजू शालेय विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन सेवा देणारे हे पहिले सीएससी सेंटर आहे  आणि म्हणून या सेंटर साठी डॉ. प्रणोती राहुल जगताप यांनी एक झेरॉक्स मशीन देण्याचे उद्घाटन कार्यक्रमात घोषित केले आहे.

तर एका आदिवासी समाजातील दाम्पत्याने अनाथ व निराधार मुलांना  मोफत सेवा पुरवणे ही सोपी गोष्ट नाही यातून नक्कीच अनाथ व निराधार मुलांना त्यांचा शिक्षणात मदत मिळेल बोलताना ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे संचालक बापू ओहोळ म्हणाले.

अनंता पवार म्हणाले की संतोष व छायाताई सतत काहीना काही उपक्रमातून समाजसेवा करत असतात त्यातच एक भर म्हणून आज सीएससी सेंटर सुरू केले आणि यातही अनाथ निराधार मुलांसाठी मोफत ऑनलाईन सेवा व गरजू विद्यार्थ्यांना मोफत झेरॉक्स यातही त्यांची समाजसेवा दिसत आहे.

या चांगल्या कामासाठी बाळासाहेब थोरात, प्रतिभा उंडे, शीतल शिर्के, सुनील पाटील, अनुराधा जगताप, भाऊसाहेब डांगे, संतोष जाधव, राजेंद्र काकडे, मनेश जगताप, भाऊ क्षीरसागर, सुनील पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. या सीएससी सेंटर द्वारे मुलांसाठी मोफत झेरॉक्स व अनाथ निराधार यांना मोफत ऑनलाईन सेवा याचे संदेश सर्वत्र कौतुक होत आहे.

तर या कार्यक्रमासाठी अनिल वीर, बंडू काकडे, आशिष लडकत, गणेश काकडे, व ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे जालिंदर शिंदे, पल्लवी शेलार, उज्वला मदने, लता सावंत, आणि लोणी व्यंकनाथ गावातील प्रतिष्ठित सर्वच व्यक्ती उपस्थित होत्या. हा उद्घटनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप डांगे व मित्रपरिवाराने मदत केली.

संबंधित लेख

लोकप्रिय