Wednesday, February 19, 2025

पाच राज्यांच्या मतमोजणीला सुरूवात, उत्तरप्रदेशमध्ये भाजप आघाडीवर तर पंजाबमध्ये आम आदमी आघाडीवर

मुंबई : आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. यामध्ये पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांचा समावेश आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली असून अवघ्या काही तासांमध्येच आपल्याला कल समजणार आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये एकूण 403 पैकी भाजप 250, सपा 110, बसपा 5, काँग्रेस 4, मणिपूरमध्ये 60 पैकी भाजप 28, काँग्रेस 15, एनपीपी 9, इतर 14, गोव्यात 40 पैकी भाजप 19, काँग्रेस 14, आप 1, उत्तराखंडमध्ये 70 पैकी भाजप 39, काँग्रेस 26, पंजाबमध्ये 117 जागांपैकी आप 88, काँग्रेस 18, अकाली दल 8, भाजप 3 जागांवर आघाडीवर आहे.

देशामध्ये 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत पाच राज्यांमध्ये निवडणुकांची प्रक्रिया पार पडली होती.

(हे आकडे सातत्याने बदलत आहेत.)

Related Articles

- Advertisement -

Latest Articles