पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर व युवा नेते पार्थ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आज पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघातील महिला पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक महिला अध्यक्षा कविता आल्हाट यांच्या नियोजनाखाली पार पडली. (PCMC)
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष संघटना मजबूत करणे, संघटना वाढ करणे, तसेच बूथ कमिटी नियोजना संदर्भात महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यादरम्यान प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी फोन कॉन्फरन्स द्वारे महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला व मार्गदर्शन केले. (PCMC)
यावेळी कार्याध्यक्ष कविता खराडे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष संगीता कोकणे, कार्याध्यक्ष उज्वला ढोरे, बचत गट महासंघ सेल अध्यक्ष ज्योती गोफणे, ओबीसी सेल अध्यक्ष सारिका पवार, सुनंदा काटे, प्रेमा शेट्टी, रिजवाना सय्यद, सपना कदम, शितल पवार, आशा मिसाळ, मनीषा गवळी, प्रवीणा पिल्ले, पूनम भालेकर, अंकिता साबळे, नलिनी ताई, अंजली हवालदार तसेच भोसरी विधानसभेतील महिला पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होत्या.
हे ही वाचा :
अणूशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन
जगातील सर्वाधिक पगार घेतो ‘हा’ भारतीय वंशाचा माणूस, पगार ऐकून थक्क व्हाल
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे सरकारने घेतले परत ? वाचा काय आहे प्रकरण !
चीनमध्ये पुन्हा कोरोनासारख्या नव्या विषाणूचा कहर, जगाची चिंता वाढली
मोठी बातमी : शेतकऱ्यांना मोठा दिलासा : ‘त्या’ जमिनी परत करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कंडोमपासून आलू भुजियापर्यंत ऑनलाईन विक्रमी खरेदी, यादी एकदा वाचाच !