Junnar / आनंद कांबळे : महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे यांच्या तर्फे सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या प्रवीण परीक्षा व पंडीत परीक्षा भाग एकचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला. या परीक्षांमध्ये महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड संजय शिवाजीराव काळे, अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. विलास कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ महादेव वाघमारे, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ रविंद्र चौधरी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या समन्वयक प्रा प्रतिभा लोढा, पर्यवेक्षक प्रा समीर श्रीमंते यांनी विशेष कौतुक केले आहे.
प्रवीण परीक्षेमध्ये पुढील विद्यार्थ्यांनी केंद्रामध्ये प्रथम श्रेणीमध्ये गुणानुक्रमांक प्राप्त केले. प्रथम क्रमांक- कु.सानिका एकनाथ लांडे, द्वितीय क्रमांक कु.तैयब्बा रमजान मंसुरी व तृतीय क्रमांक कु.सायली ज्ञानेश्वर नवले व कु.कोमल बाळू कोकणे या विद्यार्थ्यांनी प्राप्त केले आहेत.
Junnar
या परीक्षांच्या आयोजनासाठी महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणेचे उपाध्यक्ष पुरूषोत्तम पगारे, प्रचार प्रमुख वृंदा कुलकर्णी, परीक्षा प्रमुख सुचित्रा कुलकर्णी तसेच प्रा डाँ निला महाडिक, निलिमा वैद्य यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. तसेच ही परीक्षा यशस्वीरित्या करण्यासाठी केंद्र प्रमुख प्रा ज्ञानेश्वर सोनार, प्रा डॉ बाबासाहेब माने, प्रा रेखा गायकवाड, प्रा विकास वाघमारे, प्रा योगेश घोडके, प्रा पूनम मनसुख यांनी विशेष प्रयत्न केले.
हे ही वाचा :
मोठी बातमी : लाडक्या बहीणींच्या खात्यात आजपासून जमा होणार डिसेंबरचा हप्ता
इयत्ता पाचवी ते आठवी ढकलगाडी अखेर बंद, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय!!
प्रसिद्ध चित्रपटनिर्माते श्याम बेनेगल यांचे ९० व्या वर्षी निधन
प्रेयसीने प्रियकराचा प्राईव्हेट पार्ट कापून केला धडापासून वेगळा, वाचा काय आहे कारण
गायांनी कारचा पाठलाग करत वासराला वाचवलं, पहा भावनिक व्हिडिओ
मुंबईत ठाकरे बंधू एकत्र : राज आणि उद्धव ठाकरे यांची भेट चर्चेला उधान
ब्रेकिंग : पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रन, फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडले