Thursday, December 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त "अभिराज फाऊंडेशन "फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांचा सत्कार

PCMC : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त “अभिराज फाऊंडेशन “फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांचा सत्कार

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे दिव्यांग क्षेत्रातील शैक्षणिक सामाजिक, क्रीडा, नाट्य क्षेत्रात विशेष नैपुण्य प्राप्त केलेल्या दिव्यांग विद्यार्थी व त्यांच्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. (PCMC)

यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, उपायुक्त प्रदीप जांभळे – पाटील, सहाय्यक आयुक्त (दिव्यांग कक्ष) श्रीनिवास दांगट व दिव्यांग भवनचे ओमप्रकाश देशमुख उपस्थित होते.

यावेळी अभिराज फाउंडेशनच्या विशेष नैपुण्य प्राप्त अशा विद्यार्थ्यांचा व शिक्षकांच्या आयुक्त शशेखर सिह यांच्यातर्फे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यामध्ये अभिराज फाउंडेशनच्या आदिती गाडे, आरुष धायगुडे, संतोष कोळी, हर्ष खेनंट, एकांश जोशी, समर्थ शेटे, कृष्णा पाटील, रविकांत बालवडकर, शिवानंद मणीकरी व” झाडे लावा झाडे जगवा या “नाटकाच्या दिग्दर्शिका वैशाली खेडेकर व संगीत दिग्दर्शक ऋषिकेश मुसूडगे यांना विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. (PCMC)

अभिराज फाउंडेशनच्या ट्रस्टी स्वाती अभिजीत तांबे, रमेश आनंद मुसडगे व सल्लागार श्री अभिजीत तांबे यांनी अभिनंदन केले आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : बॉटल बंद पाणी ‘अतिधोकादायक’ यादीत, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार ? महत्त्वाची माहिती समोर

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये विविध पदांच्या 723 जागांसाठी भरती

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? शपथविधीची जोरदार तयारी

गिनी मध्ये फुटबॉल मैदानावर दंगल, 100 ठार

डोनाल्ड ट्रम्प यांची ब्रिक्स देशांना धमकी, डॉलर बदलण्याचा विचार सोडा…

NFR : पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे अंतर्गत 5647 जागांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 690 जागांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय