Friday, December 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडMaval : जिल्हा परिषद शाळा कुसवली, मावळ येथे चित्रकला स्पर्धा

Maval : जिल्हा परिषद शाळा कुसवली, मावळ येथे चित्रकला स्पर्धा

मावळ / क्रांतीकुमार कडुलकर – मावळ, कान्हे येथील सी आय ई (CIE AUTOMOTIVE INDIA, KANHE) यांच्या कामगार समाज सेवा केंद्राच्या (EMPLOYEE SOCIAL ENGAGEMENT PROGRAM) च्या माध्यमातून मावळ तालुक्यातील कुसवली गावच्या जिल्हा परिषद शाळेत चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. (Maval)

या स्पर्धेसाठी निसर्ग संवर्धन, ग्रामीण स्वच्छता अभियान आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विजेत्यांची निवड करण्यात आली होती.

या स्पर्धेचा मुख्य उद्देश हा विद्यार्थ्यांना निसर्ग, स्वच्छता आणि पर्यावरण याची माहिती व्हावी व भविष्यात मनुष्य जीवन जगत असताना निसर्गातील पर्यावरणाची किती आवश्यकता आहे, याची जाणीव व्हावी म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला.

सीएसआर निधीच्या माध्यमातून कंपनी असे अनेक उपक्रम राबवित असते. असे
कामगार नेते अजय सातकर (भारतीय कामगार सेना सचिव, कान्हे युनिट) यांनी सांगितले.

कुसवली येथील सामाजिक कार्यकर्ते आणि कंपनीचे कामगार बळीराम शिंदे यांनी कंपनी व्यवस्थापन, कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने स्वतःच्या गावात जिल्हा परिषद शाळेतील मुलांसाठी हा उपक्रम माझ्या गावात राबवावा, अशी अनेकदा चर्चा झाली होती.

बळीराम शिंदे यांनी त्यांच्या एचआर विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करुन हा उपक्रम अतिदुर्गम भागातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या कुसवली या गावात घेण्याचे ठरवले.

कंपनी व्यवस्थापना कडून एकूण ४४ विद्यार्थ्यांना पुर्ण ड्रॉईंग सेट वाटप करण्यात आले व ज्या विद्यार्थ्यांनी चांगली चित्र काढून नंबर मिळवला त्यांना टीफीन बॉक्स व वॉटर बॉटल बक्षीस म्हणून देण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी कंपनीकडून तुषार गुंजार्गे (एचआर विभाग) व अजय सातकर (कामगार नेते) उपस्थित होते.

शालेय व्यवस्थापना कडून श्रीमती. संगिता वसंत धनवे मॅडम यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. तसेच स्वागत अंकुश मोरमारे व सुत्र संचालन गोकूळ लोंढे सर यांनी केले. (Maval) बळीराम शिंदे यांनी कंपनी आणि शाळेचे आभार व्यक्त केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

तामिळनाडूत फेंगल चक्रीवादळ आज धडकणार ताशी वेग ८० किमी

ईडीने पोर्न निर्मितीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणावर राज कुंद्राच्या घरावर छापे टाकले

राष्ट्रपती मुर्मु यांनी दिल्या युवा अभिनेत्री ईशा अगरवालला शुभेच्छा

PCMC : औद्योगिक गुणवत्ता स्पर्धा २०२४ मध्ये ३५ कंपन्यांतील ३०७ स्पर्धकांचा सहभाग

Cold wave : महाराष्ट्रात थंडीची लाट, पुणे 9.9°C

PCMC : भारतीय संविधान हा मानवतेचा जाहिरनामा; महापालिका आयोजित परिसंवादात वक्त्यांचा सूर

PCMC : लेवा भ्रातृ मंडळाच्या वतीने डिजिटल संस्कार शिबिराचे आयोजन

संबंधित लेख

लोकप्रिय