Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाच नेत्यांना पक्षातून थेट हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निलंबनामुळे पक्षात आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून विश्वास नांदेकर (जिल्हाप्रमुख, वणी विधानसभा), माजी आमदार रुपेश म्हात्रे (भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख), चंद्रकांत घुगूल (झरी तालुकाप्रमुख), संजय आवारी (मारेगाव तालुकाप्रमुख) आणि प्रसाद ठाकरे (वणी तालुकाप्रमुख) या नेत्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून थेट निलंबित केलं आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे पक्ष संपर्क प्रमुख असलेल्या रुपेश म्हात्रे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या आहेत. त्यामुळे त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाच नेत्यांना पक्षातून थेट हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला असून, या निलंबनामुळे पक्षात आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Uddhav Thackeray
हेही वाचा :
दिवाळीनंतर सोनं झालं स्वस्त ; ग्राहकांसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर
रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावरून बदली; महाविकास आघाडीला मोठे यश
दिवाळीच्या फराळातून मतदारांना पैसे वाटप ; सांगलीत शरद पवार गटाचे उमेदवार अडचणीत
मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार
जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ
लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर