Malaika arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मलायकाचे वडील अनिल अरोरा यांनी आत्महत्या केली असून, वांद्रे येथील अल्मेडा पार्क इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले आहे. आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आत्महत्येचे ठोस कारण समोर आलेले नाही आणि कोणतीही सुसाईड नोटही सापडलेली नाही. अनिल अरोरा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, तपास सुरू आहे. मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा हे पंजाबी हिंदू कुटुंबातील होते.
अनिल अरोरा यांनी मल्याळी ख्रिश्चन कुटुंबातील जॉयस पॉलीकार्पशी लग्न केले. अनिल अरोरा हे इंडियन मर्चंट नेव्हीत नोकरीस होते आणि त्यांचे मूळ कुटुंब पंजाबच्या फाजिल्का येथे होते.
Malaika arora
घटनेची माहिती मिळताच मलायका अरोरा पुण्यातून तातडीने मुंबईसाठी रवाना झाली आहे. त्याचवेळी तिचा पूर्व पती, अभिनेता अरबाज खान, अरोरा कुटुंबाला धीर देण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचला आहे.
हेही वाचा :
संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग
ड्रायव्हींग लायसन्सच्या ‘स्मार्ट कार्ड’ रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत
धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती
ब्रेकिंग : मलायकाच्या वडिलांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
शेतात काम करताना विद्युत तारेचा स्पर्श, चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू
JCI : ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती
मोठी बातमी : कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी
मोठी बातमी : ‘आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरेंचे’ नाव राज्यातील ‘या’ मोठ्या धरणाला
मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार
मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात
शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती