Monday, December 30, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडALANDI : आळंदी ग्रामीण रुग्णालयात बीसीजी लशीकरणास सुरुवात

ALANDI : आळंदी ग्रामीण रुग्णालयात बीसीजी लशीकरणास सुरुवात

टीबी मुक्त भारत साठी आरोग्य प्रशासन सज्ज (ALANDI)

आळंदी / अर्जुन मेदनकर
: येथील आळंदी ग्रामीण रुग्णालयात बीसीजी लशीकरणास माजी विरोधी पक्ष गटनेते डी.डी.भोसले पाटील यांचे हस्ते फीत कापून उदघाटन करण्यात आले. (ALANDI)

टीबी मुक्त भारत साठी प्रत्येक्ष १८+ बीसीजी लसीकरण अभियान राबवून टीबी मुक्त भारत व्हावा यासाठी Adult बीसीजी लसीकरण करण्यास मंगळवारी ( दि. १० ) लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली असल्याचे आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी सांगितले.

या प्रसंगी आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, गोविंद ठाकूर तौर, अर्जुन मेदनकर, रवींद्र जाधव, गोविंद महाराज गोरे, विलास वाघमारे आदीसह लाभार्थी उपस्थित होते.

लशीकरण मोहीम पुढील काही महिने सुरु रहाणार असून पहिल्या दिवशी ६० लाभार्थ्यांना लस टोचण्यात आली. ज्यांचे वय १८ वर्षांवरील आहे. अशा लाभार्थ्याना लस घेण्याचे आवाहन डॉ. उर्मिला शिंदे यांनी केले आहे.

याशिवाय पूर्वीच्या टीबी बरे झालेल्या रुग्णांनी, टीबी रुग्णांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीं, ६० + वय असलेल्या व्यक्तीं, कुपोषित प्रौढ व्यक्तीं, मधुमेही आणि धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींनी या लशीकरणात सहभागी होऊन लशीकरां करून घेण्यासाठी हि मोहीम राबविण्यात येत आहे.

वय १८ वर्षांवरील नागरिकांनी या लशीकरण्यात सहभागी व्हावे यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. आळंदी ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

टीबी मुक्त भारत साठी आरोग्य प्रशासन सज्ज झाले असून येत्या तीन महिन्यात मोठ्या प्रमाणात लशीकरण केले जाणार आहे. नागरिकांनी या लशीकरण मोहिमेत लस असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय