११ महाविद्यालयातील ७५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध १५ स्पर्धा उत्साहात (ALANDI)
आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील माईर्स एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील गणित विभागाने तीन दिवसीय मॅथलेटिक्स: पॉवर युवर ब्रेन या आंतरमहाविद्यालयीन विविध स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले आहे. (ALANDI)
या स्पर्धां मध्ये पुणे विभागातील ११ महाविद्यालयातील ७५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध १५ स्पर्धा उत्साहात झाल्या. परिसरातून मोठा प्रतिसाद मिळाला.
एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील गणित विभागाने नॉलेज फुजन फेस्ट अंतर्गत तीन दिवसीय मॅथलेटिक्स: पॉवर युवर ब्रेन या आंतरमहाविद्यालयीन विविध स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धांमध्ये पिंपरी चिंचवड आणि पुणे विभागातील ११ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सेंट मीरा कॉलेज, जि. एच. रायसोनी, हरिभाई व्ही. देसाई कॉलेज, प्रतिभा कॉलेज, तेलंग सीनियर कॉलेज, सरहद कॉलेज, एमआयटी एओई, झील इन्स्टिटयूट, एआयटी कॉलेज, ए टी एस एस चिंचवड कॉलेज, इंदिरा कॉलेज, आदी महाविद्यलयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यात १५ स्पर्धेंचे उत्साहात आयोजन करण्यात आले. यामध्ये ७५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रेझेंटेशन, मॉडेल मेकिंग, पीपीटी प्रेझेंटेशन, चेस, क्यूब सोलविंग, फ्रेंडशिप ट्रिव्हिया, खाना खजाना, स्कॅव्हेंजर हंट, मॅथ्स कोडींग, मेथ पझ्झल व प्रश्नमंजुषा या स्पर्धामध्ये आपले कौशल्य दाखवून या तीन दिवसीय गणिती ज्ञान सर्व शास्त्र मध्ये का गरजेचे आहे याची माहिती मिळवली.
विद्यार्थ्यांकडून उत्तम व्यावसायिक व तांत्रिक गोष्टींन मध्ये गणिताचा वापर कसा करावा आणि त्या माध्यमातून रोजच्या जीवनातील गोष्टी कशा सुलभ कराव्या याचेही सादरीकरणे करण्यात आले.
एमआयटी एओई, आळंदी येथील प्रा. मनीषा पानसरे, प्रा. अझर शेख व प्रा. सिनी रॉन्सन यांनी विविध स्पर्धांमध्ये जज म्हणून काम केले.
स्पर्धक विजेते आणि उपविजेत्यासाठी ट्रॉफीसह रोख बक्षिसे आणि सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली.
ह्या तीन दिवसीय इव्हेंट चे उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे श्रीनिवास, फॉऊंडर मोहालॅब्स तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.बी. वाफारे, उपप्राचार्या प्रा.अक्षदा कुलकर्णी, विभाग प्रमुख डॉ. प्रदीप पानसरे, सर्व विभागांचे प्रमुख, सर्व शिक्षक, विद्यार्थी समन्वयक, विविध महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. समारोप कार्यक्रमास साजित खेतानी उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे, उपप्राचार्या प्रा. अक्षदा कुलकर्णी , डॉ. मानसी अतितकर, विभाग प्रमुख डॉ. प्रदीप पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसीय मॅथलेटिक्स सप्ताह २०२४ यशस्वी रित्या पार पडला.
कार्यक्रम यशस्वी करण्यास MSc (IMCA) व BSc (CS) च्या विद्यार्थ्यांनी तसेच गणित विभागातील सर्व शिक्षक प्रा. सुषमा चाळके, प्रा. संजय गुंजाळ, प्रा. विजयलक्ष्मी कोठेवाले, प्रा वसंत करमाड, डॉ राहुल खलाटे, प्रा. तृप्ती निगडीकर, मनोज ढाके यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे संयोजन प्रा मंजुळा चौधरी यांनी केले. विद्यार्थी प्रतिनिधी ओंकार जाधव, साहिल वायकर यानी सर्व स्पर्धेत विद्यार्थी समन्वयक म्हणून यशस्वी कामकाज केले.