HIV positive : त्रिपुरा राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी (TSACS) च्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, 800 पेक्षा अधिक विद्यार्थी एचआयव्हीग्रस्त आहेत. आतापर्यंत 572 मुले जिवंत आहेत, तर 47 जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी राज्याबाहेर गेले आहेत.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या विद्यार्थ्यांचा समावेश 220 शाळा, 24 महाविद्यालये आणि विद्यापीठांमधून झाला आहे. या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश मुले श्रीमंत कुटुंबातील आहेत. परंतु, एचआयव्ही विषाणूचा प्रसार अचानक कसा झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
एचआयव्ही विषाणूचा (HIV positive) प्रसार प्रामुख्याने संक्रमित सुयांच्या वापरामुळे होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, एचआयव्ही शरीरातील द्रवपदार्थांमध्ये असतो आणि एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताच्या संपर्कात आल्यास त्याचा प्रसार होतो. एचआयव्ही विषाणू रक्त, आईचे दूध, वीर्य आणि योनिमार्गातून पसरतो.
एचआयव्ही संसर्गानंतर शेवटच्या टप्प्याला एड्स म्हणतात. या अवस्थेत रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, ज्यामुळे त्याला इतर आजार होतात आणि शेवटी मृत्यू होतो. एचआयव्हीचे सुरुवातीचे लक्षणे म्हणजे फ्लूच्या लक्षणांप्रमाणे असतात. ताप, थंडी, पुरळ, झोपेच्या वेळी घाम, स्नायू दुखणे, घशात सूज, थकवा, लिम्फ नोड्समध्ये सूज आणि तोंडात व्रण ही लक्षणे संसर्गाच्या 2 ते 4 आठवड्यांच्या आत जाणवू शकतात.
HIV positive
डब्ल्यूएचओच्या मते, एचआयव्हीवर अजूनही कोणताही इलाज नाही. अँटीरेट्रोव्हायरल औषधे विषाणूचा प्रसार रोखतात. सुरक्षित लैंगिक संबंध, एचआयव्ही चाचणी आणि नवीन सुयांचा वापर या उपायांनी स्वतःचे संरक्षण करता येऊ शकते. या संदर्भातील बातमी एका वृत्त संस्थेने दिली आहे.
हेही वाचा :
धक्कादायक! पुण्यात ‘ऑनर किलिंग’, आंतरधर्मीय विवाहाचा राग!
Pune : पुणे येथे भारती सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती
वसंत मोरेंचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, उद्धव ठाकरेंनी दिली मोठी जबाबदारी
मोठी बातमी : राज्यातील अनेक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के: नागरिकांत भीतीचे वातावरण
धक्कादायक : भटक्या कुत्र्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तरुणाचा तिघांवर जीवघेणा हल्ला
Mumbai : मुंबईसह कोकणात पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरू
महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य; १५ व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार जाहीर
दिवसा ढवळ्या बिबट्याचा वावर, दुचाकीस्वार थोडक्यात बचावला
मेंदू खाणाऱ्या अमिबाने 14 वर्षांच्या मुलाचा घेतला जीव
रिलसाठी स्टंट करताना दुचाकीवरून तरुणाचा भीषण अपघात, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल