Wednesday, September 18, 2024
Homeताज्या बातम्याTushar Bhalke : पोलीस भरती चाचणीदरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, सर्वत्र हळहळ

Tushar Bhalke : पोलीस भरती चाचणीदरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, सर्वत्र हळहळ

Tushar Bhalke : मुंबई येथे एसआरपीएफ भरतीच्या मैदानी चाचणी दरम्यान दोन तरूणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुण्यातही एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

राज्यभरातील अनेक तरुण-तरुणी पोलीस भरतीसाठी अहोरात्र मेहनत घेत असतात. अशाच मेहनतीने पोलीस होण्याचे स्वप्न बाळगून तुषार भालके (Tushar Bhalke) हा संगमनेर तालुक्यातील 27 वर्षीय युवक मागील काही वर्षांपासून तयारी करत होता. पोलीस भरतीची तारीख जाहीर होताच आपले नशीब आजमावण्यासाठी तुषारने पुणे गाठले. मात्र, त्याचे पोलीस बनण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.

Tushar Bhalke

अंतिम चाचणी सुरु असताना तुषारने पोलीस मैदानातच अखेरचा श्वास घेतला, त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे, तर भालके कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मृत तुषार भालके (Tushar Bhalke) हा संगमनेर तालुक्यातील रहिवासी आहे. पुण्यात सुरू असलेल्या पोलीस भरती मैदानी चाचणी दरम्यान धावत असताना तुषारला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. खाकी वर्दी घालून देशसेवा करण्याचे त्याचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले.

पुण्यात शिवाजीनगर पोलीस ग्राऊंडवर पोलीस भरती प्रक्रिया सुरू होती. तुषार भालके या युवकाने धावण्याच्या चाचणीत तीन राऊंड पूर्ण केले. मात्र, धावत असताना त्याच्या पायात अचानक क्रँम्प आला, मस्सल ब्रेक झाले आणि तो जागीच कोसळला. घटनास्थळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला तात्काळ अँम्ब्युलन्समधून पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले. डिहायड्रेशनमुळे प्रथम त्याची किडनी फेल झाली, नंतर ह्रदय बंद पडले आणि मल्टिपल ऑर्गन फेलुअरमुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शनिवारी (६ जून) रोजी ही घटना घडली.

दरम्यान, या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

धक्कादायक : 800 हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह, 47 मुलांचा मृत्यू !

भाईंदर रेल्वे स्थानकावर पिता-पुत्राची आत्महत्या, हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक! पुण्यात ‘ऑनर किलिंग’, आंतरधर्मीय विवाहाचा राग!

Pune : पुणे येथे भारती सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

वसंत मोरेंचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, उद्धव ठाकरेंनी दिली मोठी जबाबदारी

मोठी बातमी : राज्यातील अनेक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के: नागरिकांत भीतीचे वातावरण

दिवसा ढवळ्या बिबट्याचा वावर, दुचाकीस्वार थोडक्यात बचावला

रिलसाठी स्टंट करताना दुचाकीवरून तरुणाचा भीषण अपघात, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

संबंधित लेख

लोकप्रिय