Murder of teacher : आसाम राज्यातील शिवसागर जिल्ह्यात शनिवारी एक धक्कादायक घटना घडली. कोचिंग सेंटरमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने रागाच्या भरात आपल्या शिक्षकावर हल्ला करून त्यांची हत्या केली. हल्ला करणारा विद्यार्थी अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विद्यार्थी इयत्ता ११वीत शिकत असून तो शिवसागर येथील एका कोचिंग सेंटरमध्ये शिकायला जायचा. घटनाक्रमाच्या एक दिवस आधी शिक्षकाने विद्यार्थ्याला शिवीगाळ केल्याचा दावा आरोपीच्या मित्रांनी केला आहे. हत्येच्या दिवशी, वर्गात शिकवत असताना, विद्यार्थ्याने अचानक शिक्षकावर चाकूने हल्ला केला. शिक्षक गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले. या घटनेनंतर कोचिंग सेंटरमध्ये गोंधळ उडाला होता. (Murder of teacher)
घटनेची माहिती मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना घटनास्थळी हल्ल्यात वापरण्यात आलेला चाकू मिळाला. जखमी शिक्षकांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे. विद्यार्थ्याच्या एका मित्राने दिलेल्या माहितीप्रमाणे, आदल्या दिवशी शिक्षकाने विद्यार्थ्याला शिवीगाळ केली होती, ज्यामुळे रागाच्या भरात त्याने हा धक्कादायक निर्णय घेतला.
या घटनेनंतर पालक, शिक्षक आणि विद्यार्थी समाजामध्ये चिंता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून यापुढील चौकशी आणि तपासणी सखोलपणे केली जात आहे. अशा प्रकारच्या हिंसक घटनांनी शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.
हेही वाचा :
धक्कादायक : भटक्या कुत्र्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तरुणाचा तिघांवर जीवघेणा हल्ला
Mumbai : मुंबईसह कोकणात पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरू
महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य; १५ व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार जाहीर
दिवसा ढवळ्या बिबट्याचा वावर, दुचाकीस्वार थोडक्यात बचावला
मेंदू खाणाऱ्या अमिबाने 14 वर्षांच्या मुलाचा घेतला जीव
रिलसाठी स्टंट करताना दुचाकीवरून तरुणाचा भीषण अपघात, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
जगातील पहिली CNG बाईक प्रदूषणमुक्त भारत ध्येय साध्य करेल – नितीन गडकरी
नाणेघाट : इतिहासाची आणि नैसर्गिक सौंदर्याची संगमभूमी
मोठी भरती : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत भरती; पगार 64480 पर्यंत
ब्रेकिंग : मुख्याध्यापक नियुक्तीसाठी पटसंख्येचा निकष बदलणार ?
गावठी दारू तयार करणाऱ्या १० हातभट्ट्यांवर छापा; २ लाख १७ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त
AIASL मार्फत विविध पदांच्या 3256 जागांसाठी मेगा भरती
ब्रेकिंग : महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जाहीर