कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी पुणे येथे भेट घेतली.
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि.१० – गेल्या पाच दशकांहून अधिक काळ राजकारण व समाजकारणात यशस्वी ठसा उमटवत समाजाच्या प्रत्येक घटकाकडे आस्थेने दृष्टी ठेवून प्रतिकूल परिस्थितीत पक्षाला पुन्हा नवसंजीवनी दिली आणि १० पैकी ८ खासदार जिंकून पक्षाला पुन्हा उभारी दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी आज पुणे येथे शरदचंद्र पवार यांची भेट घेतली. आणि विशेष पत्राद्वारे वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत आशिर्वाद घेतले. pcmc
यावेळी राज्य उपाध्यक्ष राजेश माने, युवकचे सुरज देशमाने, शहर उपाध्यक्ष काशिनाथ जगताप उपस्थित होते.
आज आपण आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचे प्रेरणास्रोत आहात, ज्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी होते, ते जवळचे अनेक सहकारी सोडून गेले पक्ष अडचणीत आला असताना एकनिष्ठ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या माध्यमातून पक्षाचे काम निष्ठेने पुढे जात आहे, याही कठीण काळातून पुढे जाऊ असा आशावाद देत पुन्हा विश्व निर्माण करण्याची जिद्द सर्वानां दिली, आणि राजकीय संघर्षात विविध आव्हानांचा सामना केलात. Letter of best wishes
आज महाराष्ट्रात वयाच्या ८४ व्या वर्षीही तरुणांना लाजवेल अशा प्रकारची हिम्मत आणि ताकद निवडणुकीच्या कालावधीमध्ये दोन महिन्यापेक्षा अधिक कालावधी अविश्रांत न थांबता भटकंती करत यश खेचून आणलेत. आज तुम्ही महाराष्ट्राचा आश्वासक चेहेरा आहात.
दुर्दम्य परिस्थितीशी कसं लढावं याचं ज्वलंत उदाहरण तुमच्यापेक्षा दुसरं काहीच असू शकत नाही, आम्हा सामान्य कार्यकर्त्यांना आमच्या पुढील कार्यास असेच बळ देत रहा, जनसामान्यांचा आवाज दिल्लीत पोहोचवणाऱ्या आपल्या आठही निष्ठावान शिलेदार महाराष्ट्रातील जनतेचा स्वाभिमान बाळगणार आहेत. pcmc
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार सुमारे २५ वा आरोप्य महोत्सवी वर्धापन दिन साजरा करत असताना चांद्यापासून, बांद्यापर्यंत, शेतकऱ्यापासून ते कष्टकरी कामगारापर्यंत हा पक्ष लोकाभिमुख होतो आहे. Letter of wishesh to Sharad Pawar
तुमची प्रेरणा,मार्गदर्शना आविरत भेटण्याची अंगीकृत करण्याची शक्ती आम्हास मिळत राहो. याच वर्धापन दिनाच्या शुभेच्छा! असे कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी पत्रात नमूद केले आहे.
हेही वाचा :
Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती
मोठी बातमी : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यावर हल्ला
ब्रेकिंग : ममता बॅनर्जी यांचा मोठा दावा काही दिवसांत इंडिया आघाडीचे सरकार
मोठी बातमी : इंडिया आघाडीकडून नितिश कुमार यांना पंतप्रधान पदाची ऑफर
ब्रेकिंग : शिंदे गटाच्या नेत्यांचा खळबळजनक दावा, ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्कात
ब्रेकिंग : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन
ICF : 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांसाठी इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 680 जागांसाठी भरती
मोठी बातमी : राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ते ११ जून दरम्यान हाय अलर्ट