महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची स्थायी समितीमध्ये मान्यता
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी-चिंचवड महापालिका प्राथमिक शिक्षण विभागात काम करणाऱ्या २०४ बालवाडी शिक्षक व सेविका यांना महापालिका प्रशासनाकडून ‘मान्सून गिफ्ट’ मिळाले आहे. pcmc
संबंधित कर्मचाऱ्यांना मानधनामध्ये १० टक्के वाढ देण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीमध्ये मंजुरी देण्यात आली. महापालिका शिक्षण विभागाच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षण विभागात सध्या २०४ बालवाडी कार्यरत आहेत. pcmc
या बालवाड्यांमध्ये १९२ शिक्षिका, १ मुख्य समन्वयक, ८ समन्वयक आणि ३ बालवाडी सेविका असे २०४ कर्मचारी मानधन तत्वावर काम करीत आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांची मानधनामध्ये दर दोन वर्षांनी एकवटउ मानधनाचे १० टक्के वाढ करण्याबाबत २०२१ मध्ये मान्यता देण्यात आली आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये सदर कर्मचाऱ्यांच्या सेवेची दोन वर्षे पूर्ण झाली आहेत.
त्यामुळे ऑक्टोबर २०२३ पासून संबंधितांना मानधनामध्ये वाढ करणे अपेक्षीत होते. याबाबत भाजपा आमदार महेश लांडगे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले असून, महापालिका स्थायी समितीमध्ये संबंधित प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली आहे.
२०४ बालवाडी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
बालवाडीमध्ये शिकणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचे कर्तव्य बालवाडी शिक्षिका व सेविका करीत आहेत. दोन वर्षांच्या सेवेनंतर १० टक्के मानधनामध्ये वाढ करावी, असा निर्णय झाला आहे. पण, २०२३ पासून या निर्णयाची अंमलबजावणी तांत्रिक बाबींमुळे झाली नाही. याबाबत प्रशासनास सूचना केली होती. त्यामुळे २०४ बालवाडी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.


हेही वाचा :
ब्रेकिंग : केंद्रीय मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर, वाचा कुणाला मिळाले कोणते खाते ?
मोठी बातमी : शाळकरी मुलांसाठी ‘एक राज्य एक गणवेश’ योजना लागू होणार
Manipur : अस्वस्थ मणिपूर, शांत करा, संघाचा (RSS) केंद्र सरकारला इशारा?
Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती
मोठी बातमी : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यावर हल्ला
ब्रेकिंग : ममता बॅनर्जी यांचा मोठा दावा काही दिवसांत इंडिया आघाडीचे सरकार
मोठी बातमी : इंडिया आघाडीकडून नितिश कुमार यांना पंतप्रधान पदाची ऑफर
ब्रेकिंग : शिंदे गटाच्या नेत्यांचा खळबळजनक दावा, ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्कात
ब्रेकिंग : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन
ICF : 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांसाठी इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 680 जागांसाठी भरती
मोठी बातमी : राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा