पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे चॅप्टरने आमच्या क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटर, भोसरी येथे गुणवत्ता स्पर्धा २०२४ आयोजित करून यावर्षीचा गुणवत्ता महिना साजरा केला. सेलिब्रेशनचे हे सलग ११ वे वर्ष होते. (PCMC)
या कार्यक्रमात ३५ संस्थांमधील ३०७ सहभागी झाले होते. एकूण १४८ संघांचा समावेश होता. त्यात ६९ केस स्टडी, ३ स्किट, ३८ पोस्टर्स आणि ३८ स्लोगन या स्पर्धेत संघांनी त्यांची गुणवत्ता सुधार यशोगाथा, स्लोगन, पोस्टर आणि स्किट सादर केले.
या समारंभाचे उद्घाटन टाटा ऑटोकॉम्प सिस्टीम लि., कोम्पोजिट डिव्हिजन ४ प्लांटचे सीनियर जनरल मॅनेजर-ऑपरेशन्स हेड सरबजीत सिंग भोगल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले यावेळी क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या, पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ.रजनी इंदुलकर, कौन्सिल सदस्य अनंत क्षीरसागर, भूपेश मॉल आणि विजया रुमाले उपस्थित होत्या. (PCMC)
समारोप सत्राचे प्रमुख पाहुणे मॅक्सियन व्हील्स इंडिया प्रा.लि.-व्यवस्थापकीय संचालक राहुल वैद्य यांचा स्मृतीचिन्ह देवून सत्कार अनंत क्षीरसागर क्यूसीएफआय परिषद सदस्य यांनी केला.
केस स्टडीचे मूल्यमापन करणारे परिक्षक हनुमंत टिकटे, मनीष फाले, प्रभु झुंजा, प्रशांत मुधलवाडकर, प्रवीण हाके, श्रीधर राव आणि विठ्ठल वाकचौरे होते. घोषवाक्य आणि पोस्टरचे मूल्यमापन धनंजय वाघोलीकर आणि परविन तरफदार यांनी केले.
पवनकुमार रौंदळ आणि प्रभू झुंजा यांनी गुणवत्तेवर प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली. टाटा ऑटोकॉम्प-इंटर प्लास्टिक डिव्हिजन क्विझ यांनी स्पर्धा जिंकली.
प्रमुख पाहुणे राहुल वैद्य आणि क्यूसीएफआय पुणे चॅप्टर कौन्सिलचे सदस्य अनंत क्षीरसागर, भूपेश मॉल, धनंजय वाघोलीकर, परविन तरफदार आणि पवनकुमार रौंदळ यांच्या हस्ते विजेत्यांना सुवर्ण, रजक आणि रौप्य स्वरूपात पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया रुमाले यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रशांत बोराटे व चंद्रशेखर रुमाले यांनी केले. (PCMC)
स्पर्धेतील सहभागी कंपन्या पुढीलप्रमाणे
अभिजीत डाय अँड टूल्स प्रा.लि.-पालघर, अभिजीत प्लास्टिक इंडिया प्रा.लि.-खेड, अभिजीत टेक्नोप्लास्ट प्रा.लि.-नाशिक, अभिजीत इंडस्ट्रीज प्रा.लि.-दादरा आणि नगर हवेली, अॅडविक हाय-टेक प्रा.लि., आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लि.-अशोक आयर्न-बेलगम, बेलरिस इंडस्ट्रीज लिमिटेड, कमिन्स टेक्नॉलॉजीज इंडिया प्रा.लि.-कोथरूड, कमिन्स टेक्नॉलॉजी इंडिया प्रा.लि.-पीसीपी-१, डॅक्सटर पॉलिमर्स प्रा.लि., एस्क्वायर हेल्थकेअर अँड लॉजिस्टिक प्रा.लि., ग्रुपो अँटोलीन चाकण प्रा.लि., आयएसी इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह कंपोनेंट्स-नाशिक, आयएसी इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह इंडिया प्रा.लि. चाकण प्लांट, इंडियाना ग्रेटिंग्स प्रा.लि.-जेजुरी, जेसीबी इंडिया लि., मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड डब्लूएचडी, पुणे युनिट-२ (सावरदरी), मिंडा कॉर्पोरेशन लि., वायर हार्नेस-म्हाळुंगे, एमएसकेएच सीटिंग सिस्टम इंडिया प्रा.लि., एसकेएचएम इंडिया प्रा.लि., स्पार्क मिंडा डीसीडी-प्लांट-२, मिंडा कॉर्पोरेशन लि., टॅको एअर इंटरनॅशनल थर्मल सिस्टम्स प्रा.लि., टॅल्ब्रोस ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट्स लि., टाटा ऑटोकॉम्प-बस बार डिव्हीजन, टाटा ऑटोकॉम्प-कॉम्पोझिट डिव्हिजन, टाटा ऑटोकॉम्प जीवाय बॅटरीज् प्रा.लि., टाटा ऑटोकॉम्प-हेंड्रिक्सन सस्पेंशन प्रा.लि., टाटा ऑटोकॉम्प-इंटिरियर प्लास्टिक डिव्हीजन, टाटा कमिन्स प्रा.लि.-फलटण., टाटा मोटर्स लिमिटेड-ईआरसी पिंपरी, टाटा मोटर्स लि., कमर्शियल व्हेईकल, टेकोनेक्स इंडिया प्रा.लि., टीएम ऑटोमोटिव्ह सीटिंग सिस्टीम, चाकण, ट्यूब प्रोडक्ट ऑफ इंडिया-शिरवळ या कंपन्यांनी सहभाग घेतला.