Thursday, May 2, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडउत्सव मैत्रीचा गेट टूगेदर 30 वर्षांनी उत्साहात साजरा उत्सव

उत्सव मैत्रीचा गेट टूगेदर 30 वर्षांनी उत्साहात साजरा उत्सव

जुन्नर / आनंद कांबळे : सन.1993 च्या शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयातील बॅच च्या वॉट्सअप ग्रुपच्या सदस्यांचे एकदिवसीय गेट टूगेदर हॉटेल गिरीजा लेण्याद्री येथे मोठया उत्साही व आनंदी वातावरणात मोठ्या संख्येने साजरे करण्यात आले अशी माहिती गृप चे संस्थापक अध्यक्ष सौ.शिल्पा पांडे यांनी दिली.

गेट टूगेदर संदर्भात अधिक माहिती देताना ग्रुप ची संकल्पना व प्रस्तावना शिरीष नवले व संदिप बेल्हेकर यांनी माहिती दिली की, हा ग्रुप सर्व समावेशक असून यामध्ये अत्यंत सामान्य नागरिकापासून साहित्य, शिक्षण, कला, क्रीडा, समाजकारण, अधिकारी, डॉक्टर, वकील, मीडिया, नोकरदार वर्ग गृहिणी आदि क्षेत्रातील अनेक मान्यवर सहभागी आहेत.

प्रथम सर्व सदस्य शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय येथे जमा होऊन माजी मुख्याध्यापिका अंजली कचरे व शाळेचे सध्याचे मुख्याध्यापक साबळे सर यांच्या हस्ते सबनीस यांच्या पुतळ्यास पुष्पहार करून एक वर्गात सर्व सदस्य बसून कचरे मॅडम यांनी क्लास घेतला व मार्गदर्शन केले.

हॉटेल गिरीजा येथे संपन्न झालेल्या गेट टूगेदर मध्ये 1993 साली शिकवत असलेले शिक्षक व शिक्षिका प्रथम त्यांच्या हस्ते गणेश पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. 

त्यानंतर शाळेचे माजी. मुख्याध्यापक मुथ्था व क्रीडा शिक्षक माजी उप मुख्याध्यापक ढमाले, ढोले मुख्याध्यापक साबळे यांनी मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर यावेळी माजी मुख्याध्यापक चायल, उप मुख्याध्यापिका काळे, माजी सुपरवायझर दाते, थोरात उपस्थित होते.

त्यानंतर सोनाली पुरवंत यांच्या सुमधुर आवाजात सरस्वती वंदनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. नंतर आपल्यातील हयात नसलेले मित्र मैत्रिणींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लियाकत आत्तार यांनी जिंदगी के सफर में हे गाणे सादर करून उपस्थित सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले.

त्यानंतर इतर सदस्यांनी देखील गाणी गायली कोणी कविता सादर केल्या. जाफरभाई इनामदार यांनी तर काळजाला भिडणाऱ्या शायरींनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवला. ज्योती बारवे यांनी सुंदर असे नृत्य करून सर्वांनाच थकीत करून सोडले. त्यानंतर प्रत्येक सदस्याने आपआपला परिचय करून दिला.  

कार्यक्रम नियोजन बाबत प्रफुल्ल काळे, महेश कदम, भाऊ कुंभार, धनेश शिंगवी, किशोर भोकरे, नितीन शहा, संदिप शहा, मानसिंग परदेशी, जाफर इनामदार या सर्वांनी कोणाची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली.

नियोजनामध्ये सकाळी नाष्टा दुपारी उत्कृष्ट असं जेवण सायंकाळी पुन्हा अल्पोपहार देऊन कार्यक्रम ची सांगता केली.

तीस वर्षांनी आपले मित्र मैत्रिणी भेटल्याने झालेला आनंद शब्दात वेक्त करता येणारा नव्हता व पुन्हा असा भव्य कार्यक्रम करणार असून ग्रुप च्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जातील अशी माहिती दैनिक वृत्तपत्र “अग्निदिव्य” चे पत्रकार महेश कदम यांनी सांगितले.

सूत्र संचालन अमोल गायकवाड व सविता भोहरे यांनी केले आणि जाफर इनामदार यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय