Shirur : बारामती लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर सर्व ईव्हीएम मशिन्स ज्या स्टाँग रुममध्ये ठेवण्यात आले. त्या रुमची सीसीटीव्ही काही वेळासाठी बंद झाल्याचा प्रकार समोर आला होता. यावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाने संशय व्यक्त केला होता. आता पुन्हा अशीच एक घटना समोर आली आहे. बारामती नंतर आता शिरुरमध्येही (Shirur) सीसीटीव्ही डिस्प्ले बंद पडल्याचे सांगण्यात येत आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रकारानंतर आता शिरूर लोकसभा मतदारसंघात देखील सीसीटीव्ही डिस्प्ले बंद झाल्याचे सांगण्यात येत आहे. शिरूर लोकसभेसाठी वापरण्यात आलेले ईव्हीएम ठेवलेल्या गोदामातील सीसीटीव्ही डिस्प्ले बंद झाल्याचे सांगण्यात येत आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधींसाठी सीसीटीव्हीमधील चित्रण बघण्यासाठी डिस्प्लेची व्यवस्था करण्यात येते. परंतु, धक्कादायक बाब म्हणजे 24 तास हे सीसीटीव्ही डिस्प्ले बंद होते. हा सगळा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने सीसीटीव्ही डिस्प्ले सुरू करण्यात आले.
असे असले तरी उप जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व अफवा असल्याचा खुलासा केला आहे. उप जिल्हाधिकारी तसेच मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी असा प्रकार झाला नसल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम ठेवलेल्या गोदामातील सीसीटीव्ही सुमारे पाऊण तास बंद पडल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रतिनिधींनी केला होता. याआधी बारामती तसेच साताऱ्यातही असाच प्रकार समोर आला होता. याप्रकरणी सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही ठेकेदारास कारणे दाखवा नोटीसही बजावली होती.


हेही वाचा :
ब्रेकिंग : लिपिक टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांची यादी जाहीर
मतदारांनो…. मोबाईल ॲप व ऑनलाईन माध्यमातून काढा मतदार चिठ्ठी
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 524 जागांसाठी भरती
हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत 80 पदांची भरती
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती
भारतीय सेना TES अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!
Newsclick संपादक प्रबीर पुरकायस्थ यांची अटक बेकायदेशीर, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
खासदार नवनीत राणा यांच्या घरी चोरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एकूण किती संपत्ती, आकडेवारी एकूण व्हाल थक्क
मोठी बातमी : नारायणगावात महादेव बेटिंग ऍप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, 70 ते 80 जण ताब्यात
ब्रेकिंग : खर्च नोंदवही तपासणीसाठी सादर न केल्यामुळे दोन उमेदवारांवर गुन्हे दाखल
मोठी बातमी : विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या