(प्रतिनिधी) :- भारत आणि चीन दरम्यान पूर्व लडाख जवळच्या सामी रेषेवर गेल्या महिन्याभरापासून संघर्ष सुरु आहे. दरम्यान, चीनी सैन्य आणि भारतीय सैन्यांमध्ये आज झालेल्या झटापटीत २० जवान शहीद झाले आहेत तर चीनचे ४३ सैनिक ठार आणि गंभीर जखमी झाले आहेत. गॅल्वान खोऱ्यात सुरु असलेल्या डी-एस्केलेशन प्रक्रियेदरम्यान सोमवारी रात्री दोन्ही सैन्यात झटापट तसेच चकमक झाली. दोन्ही बाजूचे वरिष्ठ अधिकारी सध्या भेट घेऊन यावर चर्चा करती आहेत. दरम्यान चीनने उलट्या बोंबा मारण्यास सुरुवात केली असून भारतीय सैनिकांनीच हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर देताना भारतीय जवानांनी प्राण गमावल्याच चीनने म्हटले आहे.
At least 20 Indian soldiers killed in the violent face-off with China in Galwan valley in Eastern Ladakh. Casualty numbers could rise: Government Sources pic.twitter.com/PxePv8zGz4
— ANI (@ANI) June 16, 2020
भारत आणि चीन यांच्या १९६२ मध्ये युद्ध झाले होते. या युद्धानंतर १९७५ मध्ये LAC वर गोळीबार झाला, त्यात४ भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर एलएसीवर कोणताही संघर्ष झाला नाही. आज जवळपास ४५ वर्षानंतर एलएसीवर भारत आणी चीन सैनिकांमध्ये संघर्ष झाला. ज्यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले. दरम्यान, चीनचे ४३ सैनिक ठार आणि गंभीर झाले आहेत असे ANI नं सांगितले आहे.
गेल्या काही दिवसांपासून चीनचे सैनिक भारतीय हद्दीत आक्रमण करत होते. त्यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमकही झाली. त्यानंतर तणाव निर्माण झाल्याने तो दूर करण्यासाठी पडद्यामागून बऱ्याच हालचाली झाल्या होत्या. मात्र आज चिनी सैन्यानं पुन्हा भारतीय सैन्यावर हल्ला केला. काही वर्षापूर्वी डोकलामचं प्रकरण घडल्यानंतर अनेक दिवस तणाव होता. त्यानंतर चीनने माघार घेतली होती. मात्र आता पुन्हा चीनचं अतिक्रमण सुरु झालं आहे. या आधी पूर्व लद्दाखच्या गलवान घाटी, पीपी – १५ आणि हॉट स्प्रिंग या भागातून चिनी सैन्य मागे हटवण्यात आलं होतं. प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ चीनच्या भागात मोल्डो जवळ भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये ही चर्चा झाली होती.