जुन्नर : जुन्नर तालुक्यातील तळेरान येथील अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कला व वाणिज्य शाखेचा यंदाचा निकाल 100% लागला आहे.
शाळेतील वाणिज्य शाखेमध्ये रुपाली सुरेश शेळकंदे या विद्यार्थ्यांनीने 80.3% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकवला आहे. अर्जुन खेमा पोटे 79.3% द्वितीय क्रमांक, अश्विनी केरू काळे 77.8% तृतीय, तुषार शिवाजी पारधी 76% चतुर्थी, अजित लक्ष्मण डावखर 74.3% पाचवा असे अनुक्रमे गुण मिळवले आहेत.
तसेच, कला शाखेत निवृत्ती कांतीलाल कोकाटे या विद्यार्थ्यांने 78% गुण मिळून प्रथम पटकवला आहे. अंकिता विठ्ठल भांडकोळी 74% दितीय, विशाल सोमा घोडे 72.20% तृतीय तर पूजा केरु मेणे आणि यमुना दिगांबर शेळके यांना 71.8% चतुर्थी तसेच सखुबाई मारुती गारे आणि रविना धोंडिबा निर्मळ या दोघींना 71% मिळाले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेचे प्राचार्य जी. सी. नलावडे, आर. एच. भोगे, डी. आर. येवले, पी. एस. आहेर, जी. डी. पाटील, एस. आर. गायकवाड, व्ही. जी. कुर्हे, एस. एस. गायकवाड इतर शिक्षक व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन तळेरान सरपंच जयश्री कोकाटे, उपसरपंच प्रविण कोकाटे यांनी केले आहे.