Sunday, December 8, 2024
Homeग्रामीणजुन्नर : नारायणगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि ग्रामसेवकांना अटक, एका माजी सरपंचाची...

जुन्नर : नारायणगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि ग्रामसेवकांना अटक, एका माजी सरपंचाची जामिनासाठी धावाधाव !

नारायणगाव / रवींद्र कोल्हे : शासकीय निधीचा अपहार करून ५० लाख ८४ हजार ३४३ रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी नारायणगाव ग्रामपंचायतीच्या तत्कालीन दोन महिला सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांच्यावर पुन्हा गुन्हा दाखल झाला असून, माजी महिला सरपंच जयश्री सुभाष मेहेत्रे व ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गेनभाऊ खराडे यांनी अटकपूर्व जमीन साठी केलेले सर्व प्रयत्न फोल ठरल्याने अखेर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी त्यांना अटक केली. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या दुसऱ्या माजी सरपंच ज्योति प्रवीण दिवटे यांचे जामिनासाठी धावाधाव सुरू असल्याचे समजते.

याबाबत अधिक माहिती अशी की,माजी सरपंच जयश्री मेहेत्रे आणि ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे यांना मंगळवार ( दि.३ ऑगस्ट ) रोजी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली. आरोपींना जुन्नर न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलिस कस्टडी देण्यात आली असल्याची अधिकृत माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली आहे.

दरम्यान माजी सरपंच जयश्रीताई सुभाष मेहेत्रे, ज्योति प्रविण दिवटे या अनुक्रमे सरपंचपदी होत्या. त्यांच्या कार्यकाळात ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गेनभाऊ खराडे होते. या तिघांनी संगनमताने ग्रामपंचायतीत रोखीने आर्थिक व्यवहार करणे, टेंडर न काढता (टेंडरिंग) न करता खरेदी करणे, पावती नसतांना पैसे खर्च करणे, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी खर्च करणे आदी बेकायदेशीर व्यवहार करून शासकीय निधीचा अपहार करून ५० लाख ८४ हजार ३४३ रुपयांचा आर्थिक आर्थिक गैरव्यवहार केले असल्याची माहिती ग्रापंचायत दप्तर तपासणीत स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी जुन्नर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी किसन बबन मोरे यांनी शासनाच्या वतीने फिर्याद दाखल केल्याने गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पाटील, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपअधिक्षक राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सूरज बंडगर, नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, हेड कॉन्स्टेबल राहुल कदम, नितीन दळवी, विशाल साळुंखे यांनी अटक केली आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय