मुक्ता महामुनी (विज्ञान) वैष्णवी कुलकर्णी (वाणिज्य), अॅटडरिना रॉड्रिक (कला) शाखेत प्रथम क्रमांक पटकाविला
पिंपरी चिंचवड ०९ : चिंचवड येथील प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या विद्यार्थ्यांची दोलनामय मन:स्थिती होती, तरीही पालक आणि शिक्षकांच्या साथीने विद्यार्थ्यांनी यशाला गवसणी घातली. यावर्षी महाविद्यालयाचा कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचा 100 टक्के निकाल लागला.
विज्ञान शाखेतून महामुनी मुक्ता अरविंद हिने 94.% गुण प्राप्त करून प्रथम, देवघरे श्रावणी मनिष हिने 93.33 गुण प्राप्त करून द्वितीय तर जाधव अदिती संतोष हिने 89.67% गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 64 पदांसाठी भरती, 25000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी
वाणिज्य शाखेतून कुलकर्णी वैष्णवी दीपक हिने 90.17% गुण प्राप्त करून प्रथम, अन्सारी शोएब याने 88.67% गुण प्राप्त करून द्वितीय तर साळी धनराज रुपेश याने 88% गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला.
कला शाखेतून रॉड्रीक ऍडरिना हिने 91.50% गुण प्राप्त करून प्रथम, शाह रिया अमर हिने 90.17.69% गुण प्राप्त करून द्वितीय तर रंजन आदित्य याने 89.83% गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा शहा, संस्थापक सचिव डॉ.दिपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे, मुख्यप्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, शिक्षक-पालक संघ प्रतिनिधी आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.
संपादन – क्रांतिकुमार कडुलकर