Friday, June 13, 2025
---Advertisement---
---Advertisement---

आता वाहन चालवताना सोबत ठेवा ही कागदपत्रे ; अन्यथा भुर्दंड सोसावा लागेल !

---Advertisement---

पुणे : जर तुम्ही मोटरसायकलने प्रवास करत असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. प्रवासादरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे सोबत ठेवावी लागतात.तुम्ही असे न केल्यास तुम्हाला कधीही मोठं चलन भरावे लागू शकते. कारण वाहतूक पोलिसांनी पकडले की अनेक कागदपत्रे तपासतात. अशा परिस्थितीत बाईक चालवताना कोणती कागदपत्रे असायला हवीत हे जाणून घ्या. दुचाकी चालवताना ही कागदपत्रे जवळ ठेवा दुचाकी नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे आरसी (RC) हे वाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) कडे नोंदणीकृत असल्याचा पुरावा आहे.

---Advertisement---

ब्रेकिंग : राज्यसभेच्या निवडणूकीचे निकाल जाहीर, महाविकास आघाडीला मोठा धक्का

यात वाहनाचा वर्ग, वाहन वापरता येणारी मर्यादा, चासी आणि इंजिन क्रमांक तसेच वापरलेले इंधन आणि त्याची क्षमता यांची माहिती असते. त्याचेही वेळोवेळी नूतनीकरण करावे लागते. वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स (DL) असणे आवश्यक आहे. हे प्रमाणित करते की व्यक्तीला कोणत्या प्रकारची वाहने चालवण्याची परवानगी आहे.

दुचाकी, तीन चाकी, चारचाकी. तसेच वाहन चालविल्याचे प्रमाणपत्र आहे. ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपल्यानंतर त्याचे नूतनीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. AC लावल्यानंतरही अर्ध्याहून कमी येईल विजेचं बिल; फक्त या 5 टिप्स करा फॉलो वाहन चालवताना वाहनाचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असणे देखील आवश्यक आहे.

या प्रमाणपत्रात बाइकच्या उत्सर्जन पातळीबद्दल माहिती असते. त्याची पातळी सरकारने ठरवलेल्या मानकांनुसार जुळली पाहिजे. पीयूसी प्रमाणपत्र कालबाह्य झाल्यास, वाहन मालकाने त्वरित त्याचे नूतनीकरण करून घ्यावे. प्रवासादरम्यान दुचाकी अनुकूल स्थितीत असणे आवश्यक आहे.

अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल- डिझेलच्या दरात चढ उतार, पहा काय आहेत आजचे दर

वाहनाची फिटनेस आरटीओद्वारे तपासली जाते, जर त्यांना उत्सर्जन कार्यक्षमतेमध्ये काही दोष किंवा समस्या आढळल्यास ते प्रमाणपत्र जारी करत नाहीत. आता रोबोटलाही मानवासारखा स्पर्श जाणवणार, लागलं, खुपलं तर वेदना होणार! नियमानुसार, कोणत्याही वाहनाचा वाहन विमा हा ड्रायव्हरसाठी सर्वात महत्त्वाचं कागदपत्र आहे. या दस्तऐवजात विमा कंपनीचे नाव, वाहन नोंदणी क्रमांक, कव्हरेज प्रकार आणि विम्याचा कालावधी यांसारखी माहिती असते. विम्याच्या प्रकारांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो: फर्स्ट पार्टी इन्शुरन्स, थर्ड पार्टी इन्शुरन्स, ऑटोमॅटिक बाइक डॅमेज पॉलिसी. ज्यांचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवावे लागेल. वैद्यकीय प्रमाणपत्रावर प्रमाणित डॉक्टरची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे ज्याने व्यक्ती दुचाकी चालविण्यास योग्य असल्याचे मूल्यांकन केले आहे.

---Advertisement---

10 पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! मिलिटरी हॉस्पिटल, अहमदनगर येथे विविध पदांसाठी भरती

ठाणे महानगरपालिकेत अटेंडंट, तंत्रज्ञ व अन्य पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 20000 ते 25000 रूपये पगाराची नोकरी

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles