Thursday, December 12, 2024
Homeग्रामीणबीड जिल्हा परिषद वडवणी तालुक्यावर अन्याय करतेय..? - वैधानिक विकास मंडळाचा...

बीड जिल्हा परिषद वडवणी तालुक्यावर अन्याय करतेय..? – वैधानिक विकास मंडळाचा 1 कोटी 56 लक्ष निधी पडून; जिल्हा परिषदेचे कडून इतरत्र वळवण्यासाठी हालचाली सुरू..

(वडवणी/प्रतिनिधी) मराठवाडा वैधानिक विकास मंडळाकडून मानव विकास आयुक्त औरंगाबाद यांच्या मार्फत बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यासाठी विविध विकास कामांकरिता लाखो रुपयाचा मंजूर निधी मंजूर केला. परंतु जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे सदरचा निधी इतरत्र वळवण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. वडवणीकरांनी यासाठी जागृत होऊन आपल्या तालुक्याचा विकासासाठी सदरचा निधी आपल्या तालुक्यासाठीच कसा उपयोगात येईल याकरिता लक्ष वेधण्याची गरज निर्माण झाली आहे.

बीड जिल्ह्यातील वडवणी हा सर्वात छोटा तालुका असून या तालुक्याच्या निर्मितीसाठी अनेकांनी आपल्या अंगावर गोळ्या झेलाव्या लागल्या तेव्हा कुठे तालुका अस्तित्वात आला. या छोट्याशा तालुक्याला मराठवाडा विकास मंडळाच्या माध्यमातून मानव विकास आयुक्तालय मार्फत तालुक्याच्या सर्वांगीन विकासासाठी येथील आरोग्य उपकेंद्र करिता स्वास्थ्य सहाय्यक मशीन खरेदी करणेसाठी  40 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला. त्याचबरोबर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीत वाढ करण्याकरिता शाळा मधील प्रयोशाळेला मंजूर 11 लक्ष रुपयांचा निधी आला.जिल्हा स्पेसिफिक योजनेच्या माध्यमातून पाते वरती तपासणी प्रयोगशाळा करिता मंजूर 35 लक्ष रुपये निधी आला. प्राथमिक आरोग्य केंद्रात बंद किंवा वापरा योग्य नसलेल्या अॅम्बुलंन्स ऐवजी नवीन अॅम्बुलंन्स पुरविण्या करिता मंजूर 14 लक्ष रुपये निधी उपलब्ध झाला. महिला बचत गट यांना स्पायरल सेपरेटर संख्या 5 उपलब्ध करून देण्यासाठी मंजूर 06 लक्ष रुपये निधी आला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उच्च प्राथमिक व माध्यमिकच्या किमान दहा शाळामध्ये डिजिटल वर्ग निर्मिती करणे याकरिता मंजूर 40 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये ग्रंथालयात पुस्तके पुरवण्यासाठी 05 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला.

सदर कार्यक्रमाअंतर्गत 1 कोटी 56 लक्ष रुपये ऐवढा मोठा निधी मराठवाडा विकास मंडळाच्या वतीने मंजूर करण्यात आला व तो निधी मानव विकास कार्यक्रम अंतर्गत असलेल्या फक्त वडवणी तालुक्यातील विविध विकास कामे करण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. मात्र अद्यापपर्यंत सदर निधी तालुक्यातील कोणत्याही कामासाठी वापरण्यात आलेला नाही.जिल्हाधिकारी यांनी सदर प्रकरणी वडवणी तालुक्याच्या सर्वांगीन विकासासाठी लक्ष वेधण्याची गरज निर्माण झाली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय