Thursday, December 5, 2024
Homeआंतरराष्ट्रीयरशियाच्या ब्रह्मस्त्रामुळे अमेरिका चिंतीत, रशियाने केली 'या' क्षेपणास्त्राची चाचणी

रशियाच्या ब्रह्मस्त्रामुळे अमेरिका चिंतीत, रशियाने केली ‘या’ क्षेपणास्त्राची चाचणी

रशिया : रशियाच्या सैन्याने झिरकॉन हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र यशस्वी चाचणी घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोईगु म्हणाले की, रशियाच्या उत्तरेस, समुद्रामध्ये असलेल्या अ‍ॅडमिरल गोर्शकोव्ह युद्धनौकेवरुन ही चाचणी घेण्यात आली. लष्कराच्या म्हणण्यानुसार, बॅरेंटस समुद्राच्या किनाऱ्यापासून 350 कि.मी. अंतरावर असलेल्या टार्गेटचा या क्षेपणास्त्राने अचुक वेध घेतला.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सांगितले आहे की, झिरकॉन क्षेपणास्त्र ध्वनीच्या वेगापेक्षा नऊपट वेगाने उड्डाण करणार आहे. याआधी ऑक्टोबरमध्ये पुतीन यांच्या वाढदिवशी या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती. रशियन नेत्याने त्यास देशासाठी एक “महत्वपुर्ण क्षण” असे म्हटले आहे. यावेळी पुतीन म्हणाले की, “आपल्या सैन्य दलांना आणि नौदलाला अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह सुसज्ज केल्याने दीर्घकाळ आपली देशाची संरक्षण क्षमता सुनिश्चित होईल.”

झिरकॉन या हायपरसॉनिक मिसाइलची वैशिष्ट्ये :

या क्षेपणास्त्राचा वेग ध्वनीच्या वेगाच्या ७ पट म्हणजेच मॅक ७ इतका जबरदस्त आहे. अर्थात चाचणीच्या वेळेस झिरकॉन क्षेपणास्त्राने ८,६०० किलोमीटर प्रति तास इतका वेग नोंदवला आहे.

क्षेपणास्त्र सोडल्यानंतर फक्त अडीच मिनिटांत दुसऱ्या खंडातील आपले लक्ष उद्धवस्त करू शकणार आहे. अमेरिकेच्या संरक्षण यंत्रणेला चुकवून आपल्या लक्ष्यावर हल्ला करण्यात सक्षम असणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या ताफ्याने आपल्या सैन्याला शक्तीशाली बनवण्याचा रशियाचा प्लॅन आहे.

याआधी माजी अॅडमिरल गोर्शकोव्हवरूनच तीनवेळा झिरकॉन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली होती. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे की ही चाचणी पांढऱ्या समुद्रात (व्हाईट सी) करण्यात आली आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय