Friday, December 27, 2024
HomeNewsशिवनेरीवर महाआरतीचा विश्वविक्रम; गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद

शिवनेरीवर महाआरतीचा विश्वविक्रम; गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद

१९ फेब्रूवारी, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. जगभरात शिवरायांची जयंती मोठ्या जल्लोशात पार पडत आहे. राज्यामध्ये ठिकठिकाणी शिवजयंतीनिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवजयंतीच्या निमित्ताने पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ३० हजार शिवभक्तांच्या उपस्थितीत महाआरतीचा विश्वविक्रम झाला.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) महाआरतीला राज्यातील सुमारे ३० हजार शिवभक्तांनी उपस्थिती दर्शवत विश्वविक्रमाला गवसणी घातली. महिला व बालविकास, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत महाआरती सोहळा पार पडला. याप्रसंगी हभप पंकज महाराज गावडे, आशा बुचके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थित होते.

शिवभक्तांचे श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या शिवनेरीवर शिवाजी महाराजांच्या महाआरतीचा विश्वविक्रम घडला आहे. महाराष्ट्रातील शिवप्रेमी विक्रमी संख्येत या महाआरती सोहळ्यात सहभागी झाले आहेत.

या विक्रमाची नोंद घेण्यासाठी लिमका बुक ऑफ रेकॉर्डचे आधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन विभागाने पहिल्यांदाच या महाआरतीचे आयोजन केले होते. या सोहळ्याला महाराष्ट्रातील शिवभक्तांनी विक्रमी संख्येत हजेरी लावून विश्वविक्रम नोंदवला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय