आंबेगाव : आंबेगाव तालुक्यातील पाटण ते बालविरवाडी रस्त्याचे काम मनरेगा अंतर्गत सुरू झाले आहे. काम सुरू केल्याबद्दल आंबेगाव तालुका किसान सभेच्या वतीने प्रशासनाचे अभिनंदन करण्यात आले आहे.
मागील काही वर्षांपासून आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात मनरेगाची कामे अधिकाधिक कशी सुरू होतील यासाठी किसान सभेचे प्रयत्न सुरू आहेत.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये ११४९ जागांसाठी भरती
मागील वर्षी तळेघर ते घोडेगाव पर्यंत श्रमिकांनी किसान सभेच्या नेतृत्वाखाली काढलेली पदयात्रा व यानंतर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सुचनेनुसार, रोहयो उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व अधिकारी व संघटनेचे कार्यकर्ते यांची बैठक पार पडली.
दूध उत्पादकांसाठी आरपारचा लढा करण्याचा इशारा – दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती
या बैठकीनंतर आंबेगाव तालुक्यात अधिकाधिक कामे शेल्फ वर आणणेसाठी प्रशासनाने व विशेषतः गटविकास अधिकारी यांनी विशेष प्रयत्न केले. नुकतेच किसान सभेचे शिष्टमंडळ यांनी गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन गावनिहाय कोणती कामे सुरू करता येईल याबाबत सकारात्मक चर्चा केली होती.या सर्व पार्श्वभूमीवर पाटण ते बालवीरवाडी रस्त्याचे काम, मनरेगा अंतर्गत सुरू करण्यात आले आहे.
याबद्दल किसान सभा आंबेगाव तालुका समितीने पिंपरी – पाटण ग्रामपंचायतच्या सरपंच संगीता वडेकर, उपसरपंच के.डी पारधी, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक केंगले तसेच गटविकास अधिकारी जालिंदर पठारे व पंचायत समिती, आंबेगाव मधील सर्व मनरेगा टीम या सर्वांचे विशेष अभिनंदन किसान सभा, आंबेगाव तालुका समितीने केले आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध अधिकारी पदांच्या ५०० जागांसाठी भरती
किसान सभेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष कृष्णा वडेकर, सचिव अशोक पेकारी, सुभाष भोकटे, लक्ष्मण मावळे, देविका भोकटे, दत्ता गिरंगे, रामदास लोहकरे यांनी या भागात मनरेगाची कामे अधिकाधिक कशी सुरू होतील, यासाठी प्रयत्न केले जातील असा निर्धार केला आहे.