Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवली येथे जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर तीव्र टीका केली. राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणावरून संताप व्यक्त करत त्यांनी राजकीय फोडाफोडीवर कडक शब्दांत भाष्य केले.
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात एका भोजपुरी गाण्यावर बाई नाचत असल्याचा उल्लेख करताना हीच का लाडकी बहीण योजना? असा टोला लगावला. मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करत ठाकरे म्हणाले की, राज्याच्या प्रमुखांच्या कार्यक्रमांमध्ये अशा गोष्टींचा समावेश होतो याचे दु:ख आहे.
यावेळी त्यांनी शिवसेनेच्या फोडाफोडीवरही कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली. “मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली यंत्रणा असूनही, ४० आमदार उद्धव ठाकरेंच्या पक्षातून बाहेर गेले. त्यावेळी शिंदे म्हणाले होते की, अजित पवारांसोबत बसणं म्हणजे श्वास घेत येत नव्हता आणि नंतर अजित पवारच मांडीवर येवून बसले. हे राज्याचे भवितव्य आहे का?”, असा संतप्त सवाल यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी केला.अशा राजकीय फोडाफोडीचा प्रारंभ शरद पवारांनीच केला होता,” असे राज ठाकरे म्हणाले.
शिवसेनेतील फुटीवर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले की, “शरद पवारांनीच फोडाफोडीचे राजकारण सुरू केले. काँग्रेस फोडली, नारायण राणे यांना वेगळे केले. आज हे राजकारण पुढे चालू आहे. शिवसेना, धनुष्यबाण हे बाळासाहेबांचे आहेत, ना की उद्धव ठाकरे किंवा शिंदे यांचे. हे सर्व संपलं की, ते पक्ष ताब्यात घेतात.”
राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही हल्लाबोल केला. “राज्याच्या प्रमुखांच्या कार्यक्रमांमध्ये अशा गोष्टींचा समावेश होतो याचे दु:ख आहे. “महाराष्ट्र हा उत्तर प्रदेश आणि बिहारसारखा करायचा आहे का?”राज ठाकरे यांनी जनतेला जागृत राहण्याचे आवाहन केले, “महाराष्ट्र वाचवायचा आहे, हे घाणेरडं राजकारण थांबवा. एकदा माझ्याकडे सत्ता देऊन बघा,” असे म्हणत राज ठाकरे यांनी आपले आवाहन जाहीर केले.
Raj Thackeray
हेही वाचा :
रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावरून बदली; महाविकास आघाडीला मोठे यश
दिवाळीच्या फराळातून मतदारांना पैसे वाटप ; सांगलीत शरद पवार गटाचे उमेदवार अडचणीत
मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार
कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी
जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ
लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर