Sunday, December 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : गृहनिर्माण संस्थांमधील मतदान केंद्रांवर १०० टक्के मतदानाचा संकल्प

PCMC : गृहनिर्माण संस्थांमधील मतदान केंद्रांवर १०० टक्के मतदानाचा संकल्प

महापालिका, गृहनिर्माण संस्थांच्या सहाय्याने करणार जनजागृती (PCMC)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदारसंघातील गृहनिर्माण सोसायट्या मधील मतदान केंद्रांवर १०० टक्के मतदान घडवून आणण्याचा निर्धार महानगरपालिका, सोसायटी फेडरेशन आणि गृहनिर्माण संस्थाच्या समन्वय बैठकीत करण्यात आला असून मतदार जनजागृती अभियानाअंतर्गत शहरतील सर्व गृहनिर्माण संस्थांना मतदार जनजागृतीसाठी आवश्यक असलेले साहित्य देखील महापालिकेच्या वतीने पुरविण्यात येत, असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली. (PCMC)

सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदार संघात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त अण्णा बोदडे यांच्या नियंत्रणाखाली मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

त्यानुषंगाने आज महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल विजयकुमार खोराटे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील सोसायटी फेडरेशन आणि गृहनिर्माण संस्था यांच्या प्रतिनिधींसोबत समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत गृहनिर्माण संस्थांमधील मतदान केंद्रांवर १०० टक्के मतदान घडवून आणण्याचा निर्धार करण्यात आला. (PCMC)

यावेळी उपआयुक्त अण्णा बोदडे, उप आयुक्त तथा २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी पंकज पाटील, महापालिकेच्या निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांच्यासह पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, उपाध्यक्ष सुभाष कर्णिक, महासंघाचे प्रतिनिधी, चिखली-मोशी हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, उपाध्यक्ष निलेश खांडगे, फेडरेशनचे पदाधिकारी तसेच शहरातील गृहनिर्माण संस्था व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त खोराटे म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत शहरातील तीनही मतदार संघातील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुषंगाने महापालिकेच्या स्वीप टीममार्फत शहरात विविध माध्यमातून अनेक ठिकाणी जाऊन मतदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

मतदारांच्या सोयीसाठी तसेच मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या एकूण गृहनिर्माण संस्थांपैकी १५ मोठ्या गृहनिर्माण संस्थामध्ये एकूण २५ मतदान केंद्रे उभारण्यात आले आहेत. यामध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये १२ मतदान केंद्र, पिंपरी विधानसभा मतदारसंघात ६ मतदान केंद्र तर भोसरी विधानसभा मतदारसंघात ७ असे एकूण २५ मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. या मतदान केंद्रांवर १०० टक्के मतदान घडवून आणण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

त्यानुसार महापालिकेच्या मतदार जनजागृती अभियानाअंतर्गत गृहनिर्माण संस्थांना मतदार जनजागृतीसाठी आवश्यक असणारे साहित्य महापालिकेमार्फत पुरविण्यात येत असल्याचे खोराटे यांनी सांगितले.

गृहनिर्माण संस्थांनी आपल्या परिसरातील बीएलओ यांच्या सोबत समन्वय ठेवून बदललेल्या मतदान केंद्रांची माहिती मतदारांना पोहचविण्यासाठी पुढाकार घेतल्यास निर्धारित लक्ष्य अधिक प्रभावीपणे साध्य होण्यास मदत होईल.

तसेच गृहनिर्माण संस्थांमध्ये असलेल्या सांस्कृतिक समित्यांद्वारे मतदार जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करून मतदारांना मतदान करण्याबाबत प्रवृत्त करावे, असे आवाहन देखील अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी यावेळी केले.

नागरिकांना आपल्या मतदान केंद्राबाबत माहिती देण्यासाठी महापालिकेने नो यूवर पोलिंग स्टेशन सेवा सुरु केली. त्यानुसार ८८८८००६६६६ या सारथी हेल्पलाईन द्वारे नागरिकांना मतदान केंद्राबाबत माहिती देण्यात येत आल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

गृहनिर्माण संस्थांमधील १०० टक्के मतदानाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस महासंघ महापालिकेला सर्वतोपरी सहकार्य करेल तसेच महापालिकेच्या वतीने मतदानासाठी पुरविण्यात येणाऱ्या विविध सोयी सुविधा सोसायटीमधील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी सक्रीय सहभाग घेईल.

सुहास पटवर्धन (अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस महासंघ)

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर

मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर भोजपुरी गाण्यावर बाई नाचते;राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल

रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावरून बदली; महाविकास आघाडीला मोठे यश

दिवाळीच्या फराळातून मतदारांना पैसे वाटप ; सांगलीत शरद पवार गटाचे उमेदवार अडचणीत

मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार

जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

संबंधित लेख

लोकप्रिय